Month: December 2024

 श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती उत्सव श्रद्धेय भक्तीभावाने संपन्न

अक्कलकोट- ‘अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री.स्वामी समर्थ महाराज की जय’ च्या जय घोषात आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने…

वटवृक्ष देवस्थान मनोभावे स्वामी दर्शन घेण्याचे स्थान – गोपीचंद पडळकर

मंत्रिमंडळातील विस्तारीकरणात पडळकर यांना मंत्री पदासाठी महेश इंगळेंनी दिल्या शुभेच्छा   अक्कलकोट-एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यानंतर जेवढ्या शांततेने देवाचे दर्शन होईल तितके मन प्रसन्न होते. आज सर्व धार्मिक स्थळांवर भविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असताना दिसून येत आहे. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नियोजनातून श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांचे शांतचित्ताने मनोभावे दर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना लाभत आहे याचा विशेष आनंद आहे.  त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान म्हणजे श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेण्याचे महत्वाचे मुळस्थान असल्याचे मनोगत भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला व राज्य मंत्रिमंडळ विस्तारीकरणात मंत्रीपद मिळणे बाबत शुभेच्छा व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते. 0000

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनला विजेतेपद

ठाणे : खुशी गिरीची भेदक गोलंदाजी, पूनम राऊत आणि श्वेता कलपथी या सलामीच्या जोडीने केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने एमआयजी क्रिकेट क्लबचा १० फलंदाज राखून दणदणीत पराभव करत…

 ठाण्याने महिला क्रिकेटला चालना दिली

मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे प्रतिपादन   ठाणे : मुंबईच्या मैदान क्रिकेटमध्ये शिवाजीपार्कचे मैदान मुलांच्या क्रिकेटसाठी महत्वपूर्ण आहे. त्याच धर्तीवर डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती क्रिकेट स्पर्धा महिलांच्या क्रिकेटला चालना देण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे प्रतिपादन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी केले. सेंट्रल मैदानावर खेळवण्यात आलेल्या दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन आणि एमआयजी क्रिकेट क्लब यांच्यातील अंतिम सामन्याची शुभारंभी घंटा अजिंक्य नाईक वाजवण्यात आली त्यावेळी महिला क्रिकेटपटूंना सदिच्छा देताना नाईक म्हणाले. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी डॉ राजेश मढवी यांनी अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. पहीली चार वर्षे ही स्पर्धा टी-२० प्रारूपात खेळवण्यात आली. पण यंदा मुंबई क्रिकेट संघटनेने स्पर्धेला १९ वर्षे वयोगट आणि वरीष्ठ संघाच्या निवड चाचणीचा दर्जा दिल्याने मूळ प्रारूपात बदल करून ती ४० षटकांची एकदिवसीय प्रारूपात खेळवण्यात आली. यावर्षी स्पर्धेत गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लब आणि उपविजेटी रिगल क्रिकेट क्लबसह अ श्रेणीतील चौदा संघांना प्रवेश देण्यात आला होता. त्यात गतविजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. तर उपविजेता संघ दुसऱ्या फेरीतच बाद झाला होता. अंतिम सामन्याची सुरुवात करुन देण्यासाठी अजिंक्य नाईक यांच्यासह मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अभय हडप, सहसचिव दिपक पाटील, मुंबई क्रिकेट संघटनेच्या खेळ सुधारणा समितीच्या प्रिती डिमरी, निवड समिती सदस्या लिया फ्रान्सिस, विणा परळकर, स्पर्धेचे प्रमुख संयोजक डॉ. राजेश मढवी, सहसंयोजिका सुषमा मढवी, 0000

 मेजर ध्यानचंद पुस्तकाने गाठला विक्रमी 20 हजार विक्रीचा पल्ला

 नॅशनल बुक ट्रस्ट आयोजित पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त… २- लेखक संजय दुधाणे यांच्या  पुस्तकाची विक्रमी कामगिरी   पुणे –   कोथरुडमधील लेखक संजय दुधाणे यांच्या नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेल्या मेजर ध्यानचंद इंग्रजी चरित्र पुस्तकाने सर्वाधिक खपाचा नवा विक्रम केला आहे. दोन वर्षात पुस्तकाच्या 6 आवृत्या प्रकाशित झाल्या असून तब्बल 20 हजार पुस्ताकांची विक्री झाली आहे. पुण्यात सुरू असलेल्या पुणे बुक महोत्सवतही या पुस्तकाला मोठी मागणी आहे. मूळात महाराष्ट्रात क्रीडाविषयक लेखक करणारे लेखक दुर्मिळ आहे, त्यात क्रीडा पुस्तक प्रकाशित करणारे प्रकाशकही फारसे उललब्ध नसताना संजय दुधाणे यांच्या पुस्तकाचे देशात कौतुक होत आहे. नॅशनल बुक ट्रस्टने 2023 मध्ये मेजर ध्यानचंद यांचे चरित्र सर्वप्रथम प्रकातित केले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नॅशनल बुक ट्रस्टने इंडिया 75 या शिर्षकाअंतर्गत देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 75 महान व्यक्तिमत्वाची निवड केली होती. यात दुधाणे यांच्या मेजर ध्यानचंद चरित्र पुस्तकाचा समावेश करण्यात आला. 2023 मध्ये नॅशनल बुक ट्रस्टकडून ओरीसा, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मिर, राजस्थान येथील राज्य शासनाने अभ्यासक्रमासाठी मेजर ध्यानंचद चरित्र पुस्तकांची खरेदी केली. तसेच नॅशनल बुक ट्रस्टच्या दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय बुक महोत्सवातही या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंंत 20 हजार पेक्षा अधिक प्रति मेजर ध्यानचंद पुस्तकाच्या खरेदी केल्या गेल्या आहेत.  या पुस्तक विक्रीतून तब्बल 6 लाख रूपयांचे मानधन दुधाणे यांच्या खात्यात जमा झाले आहे. संजय दुधाणे यांच्या याच पुस्तकातून बालभारती इंग्रजी माध्यमातील पाचवीच्या पाठपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. प्रा. दुधाणे यांनी मेजर ध्यानचंदसह देशाचे पहिले ऑलिम्पिक विजेते खाशाबा जाधव, मेरी कोम, सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंग यांची चरित्रही लिहिली आहेत. या पुस्तकांचाही एकापेक्षा अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

उल्हासनगरातील 28 मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंशन

आयुक्त विकास ढाकणे यांचा पुढाकार   उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाच्या अंशदायी निवृत्ती वेतन(डिसीपीएस)योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवेत असताना मृत पावलेल्या 2005 नंतरच्या 28 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंशन लागू करण्यात आली आहे. त्यासाठी आयुक्त विकास ढाकणे यांनी पुढाकार घेतला असून मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख,सामान्य प्रशासनाचे उपायुक्त डॉ.विजय खेडकर,लेखाअधिकारी संजय वायदंडे,विलास नागदिवे,दीपक धनगर यांनी कागदोपत्रांची पूर्तता केली आहे. यापूर्वी या योजनेची ठोस तरतूद नव्हती.अशावेळी महाराष्ट्र शासनाने 2005 नंतर कामाला लागलेल्या व सेवेत असताना मयत झालेल्यांच्या कुटुंबीयांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून त्यांना फॅमिली पेंशन लागू करण्याचा निर्णय घेतला. तसा शासन निर्णयाचा आदेश प्राप्त होताच आयुक्त विकास ढाकणे यांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश लेखा कार्यालयाला दिले.त्यानुसार मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख,सामान्य प्रशासनाचे उपायुक्त डॉ.विजय खेडकर,लेखाअधिकारी संजय वायदंडे,विलास नागदिवे,दीपक धनगर यांनी कागदोपत्रांची पडताळणी केली असता, महानगरपालिकेत 2005 मध्ये नंतर कामाला लागलेले एकूण 28 कर्मचारी हे मृत झाल्याचे आकडेवारी समोर आली.हे कर्मचारी जेंव्हा मृत पावले तेंव्हा त्यांचे मासिक बेसिक किती होते त्याअनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंशन मिळणार आहे. 0000

अनंत महादेव भाताडे – खो-खो क्षेत्राचा आधारस्तंभ हरपला

मुंबई: खो-खो क्षेत्रातील एक उज्वल तारा, अनंत महादेव भाताडे, यांचे १३ डिसेंबर निधन झाले. आठ दशके मैदानावर कार्यरत राहून खो-खो खेळाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. भाताडे यांनी महाराष्ट्राच्या…

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

पनवेल : महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे पुढील २० वर्षांचे पाण्याचे नियोजन असलेली न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3ची आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर…

 गावे वसई-विरार महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याला ग्रामस्थांचा विरोध

वसईतील २९ गावांचा सुनावणीवर बहिष्कार वसई : महाराष्ट्र शासनाने १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेच्या अनुषंगाने वसईतील २९ गावे वसई विरार महानगरपालिकेत पुनशः समाविष्ट करण्याबाबतची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली असुन सदर प्रक्रियेवर २९ गावांच्या बहुसंख्य ग्रामस्थांनी सदर प्रक्रियाच असंविधानिक व बेकायदेशीर असुन त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली स्थानिक प्रशासकीय संस्था सद्या अस्तित्वात नसल्याचा आक्षेप घेण्यात आला असून, याप्रकरणी आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी या अन्यायाविरुद्ध आत्महत्या करण्याचा इशाराच जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या ग्रामस्थांच्या वतीने काँग्रेस नेते, तथा महाविकास आघाडीचे वसईतील पराभूत उमेदवार विजय पाटील, शिवसेना (उबाठा) चे सचिव मिलिंद खानोलकर, जनआंदोल समितीच्या नेत्या डॉमिणिका डाबरे, विनायक निकम, पायस मच्याडो, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा, कुमार राऊत व इतर सक्रिय पुढारी व कार्यकर्ते यांनी मा. जिल्हाधिकारी पालघर यांना ड. सुमित डोंगरे यांच्या माध्यमातुन कायदेशीर नोटीस (Legal Notice) बजावण्यात आली आहे. २९ गावे महानगरपालिकेत पुनशः समाविष्ट करण्यासाठी अनिवार्य असलेली कन्सल्टेशन (सल्ला मसलत) ची प्रक्रिया राबविण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात असणे गरजेचे असुन सदर २० गावांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची स्थानिक प्रशासकीय संस्था आज रोजी अस्तित्वात नाही. कायदेशीररित्या सर्वांचे म्हणणे विचारात घेतले जावे-आमदार स्नेहा पंडित-दुबे वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळणे हा निर्णय कायदेमंडळ आणि कार्यपालिकेचा असून, यात सेवा न्यायपालिकेला अधिकार नाही. २००९ साली वसईचे प्रतिनिधित्व करणारे आमदार विवेकभाऊ पंडित यांनी आंदोलनाद्वारे पालिकेतून गावे वगळायला शासनास भाग पाडले. नंतर हा विषय न्यायालयात गेला. तेथेही त्यांनी हीच भूमिका मांडली. आणि न्यायालयानेही १२ त्यानंतर हा निर्णय सरकारचा म्हणून निकाल दिला. दरम्यानच्या काळात वसईतील प्रतिनिधी बदललेले होते. आता मी नव्यानेच निवडून आलेली असून, मी गावांच्या मुद्यावर निवडणूक लढवलेली नव्हती. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विद्यमान परिस्थितीत गावातील लोकांचे म्हणणे काय आहे? हे नीट समजून घेतले पाहिजे. हा निर्णय पूर्णतः राज्य सरकारच्या आखत्यारीतला आहे. या सुनावणीला मुदत कमी दिली गेली. आम्ही तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यात आमची नावे आलेली नाहीत, अशा जनतेच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या असून, त्यांना पुरेशी मुदतवाढ दिल्या जावी, कायदेशीररित्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्या जावे, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. ०००००

१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक असल्यास वाहन जप्त होणार!

मुंबई : १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागीच वाहन जप्त करुन पोलिसांनी ताब्यात घ्यावे, असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्याने देण्यात आले आहेत. या शिवाय मालवाहतुकीसाठी २० वर्षे ही…