रमेश औताडे

मुंबई : देशभरातील विद्यार्थ्यांच्या मानसिक गणिताच्या कौशल्याला व्यासपीठ देणाऱ्या यू सी एम ए एस राष्ट्रीय स्पर्धा २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांतील ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपली गणितीय क्षमता, एकाग्रता आणि स्मरणशक्तीचे प्रदर्शन केले. यूसीएमएएसचे संस्थापक प्रा. डिनो वोंग, यूसीएमएएस आंतरराष्ट्रीय मुख्यालय मलेशियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वोंग, जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी वोंग, तसेच यूसीएमएएस इंडिया अँड नेपाळच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहल करिया यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले. ५ आणि ६ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन व अधिवेशन केंद्रात या दोन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत विद्यार्थ्यांना अवघ्या आठ मिनिटांत २०० अंकगणितीय प्रश्न सोडविण्याचे आव्हान देण्यात आले. अबॅकसवर आधारित प्रशिक्षण तसेच मानसिक गणिताच्या तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वेग आणि अचूकतेची कसोटी पार केली. आजच्या शिक्षणाचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना योग्य उत्तरापर्यंत पोहोचविणे नसून स्वतंत्रपणे विचार करणे, एकाग्रता वाढविणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता विकसित करणे हा आहे.

00000000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *