ठाणे – धर्मवीर आनंद दिघे जयंतीदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत भुईंबर आणि ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे, यांच्या नियोजनाने गरिब, गरजु, कॅन्सरग्रस्त रुग्ण तसेच डायलेसीस रुग्ण यांच्याकरीता मोफत औषधे वाटप तसेच श्रवणयंत्र बसविण्याकरीता निधी वाटपाचा कार्यक्रम चंदनवाडी शिवसेना शाखा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला.
त्यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक दत्ताराम(अप्पा) मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल भुईंबर, शिवसेना ठाणे शहरप्रमुख प्रदिप शिंदे, चंद्रकांत विधाटे,शिवसेना उपशहरप्रमुख श्री.वसंत गवाळे, शिवसेना संपर्कप्रमुख व धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे सदस्य श्री संजय ब्रीद, श्री संजय पाठक, मिलिंद दळवी, राजन पोटे, शिवसेना विभागप्रमुख महेश(मया) पाटील, जिवाजी कदम, श्रीमती देशपांडे , उपविभागप्रमुख दत्ता सावंत, रविंद्र मोरे, हरिश्चंद्र काळे, सुरेश सावंत, शाखाप्रमुख तानाजी कदम, ज्ञानेश्वर बागवे, भास्कर शिर्के, संजय भोसले,आरोग्य सैनिक डॉ. रेखा भुईंबर, त्याचप्रमाणे शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) सह संघटक राजेंद्र शिंदे, ठाणे शहर सह समन्वयक देवशी राठोड, अजय राणे, अक्षता पांचाळ, नाझ पाशा, उल्हास शिवणेकर, अझीम शेख, अजित माने, लितेश केरकर, सानिया अन्सारी, अनिल ढोपे, संजय बर्वे व सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होते.
या शिबिरात रु. 50,000/- पर्यंत औषधे वाटप आणि श्रवण यंत्रासाठी रु.50,000/- रुपयांची मदत करण्यांत आली. लक्ष्मीबाई शिवाजी गायकवाड, सविता कृष्णा शेटकर, दिपाली अनिल मोरे, श्रीनाथ शंकर गुप्ता, दिनेश रतीवाडकर या सर्व रूग्णांच्या नातेवाईकांनी तसेच सौरवी सुरेश पंडा या 4 वर्षीय श्नवण यंत्र बसविण्यात येणार्या मुलीच्या आई वडिलांनी देखील शिवसेना, शिव आरोग्य सेना आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांचं आभार व्यक्त केले.