केतन खेडेकर

मुंबई : संपूर्ण राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांचे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लाऊन त्याना अधिक सक्षम करून त्यांचे माध्यमातून राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी केले. राज्य बेरोजगार व स्वयंरोजगार फेडरेशन तसेच बृहन्मुंबई व मुंबई फेडरेशन यांचे वतीने नुकताच त्यांचा मुंबईत नरिमन पॉइंट येथील साखर भवन येथे मुंबई जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि बृहन्मुंबई बेरोजगार सेवा संस्थांचे मार्गदर्शक नंदकुमार काटकर यांचे हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आज सातत्याने सरकार दरबारी या बेरोजगार संस्थांचे प्रश्न ते मांडत आहेत. नुकतेच त्यांनी राज्यातील या सेवा सोसायट्याना विना निविदा १० लाख रुपयांची कामे सरकार कडून देण्याचे आदेश ही मंजूर करून घेतले असून येणाऱ्या अधिवेशनात ही उर्वरित प्रश्नांबाबत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सातत्याने सर्व खात्याच्या मंत्र्यांकडेही सदरच्या सेवा संस्थाना कामे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याने राज्यातील सर्व फेडरेशन च्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या  नेतृत्वाखाली राज्यातील पंजीकृत स्वयंरोजगार बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा होऊन सेवा संस्थांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत मंत्री महोदयानी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या बैठकीस आमदार प्रसाद लाड, सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, सहकार आयुक्त, उपसचिव सार्वजनिक बांधकाम विभाग,  सिकंदर पटेल लातूर, शरद देवरे नाशिक, जनार्दन चांदणे ठाणे, सचिन कोल्हापुरे रत्नागिरी, समीर रजपूत औरंगाबाद, जयंत शिरीषकर, संजय कांबळे, श्रीनिवास देवरूखकर, विजय केदारे, स्मिता अंजर्लेकर मुंबई, स्वप्नील फाटक तसेच राज्यांतील जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व संचालक यावेळी बहुसंखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *