नीतेश राणे
१६ जानेवारीला
गौप्यस्फोट करणार
मुंबई : भाजप आमदार नीतेश राणे हे आपले बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही अलीकडील घडामोडी, वक्तव्ये आणि राजकीय भूमिकांमुळे राणे कुटुंबातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत या पार्श्वभुमीवर महानगर पालिकेच्या निवडणूका संपल्यावर १६ जानेवारीला आपण निलेश राणेंचा बोलवता धनी कोण होता याचा गौप्यस्फोट करणार असल्याचे व्टिट करून जाहीर केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, संघटनात्मक निर्णय, राजकीय रणनीती आणि आगामी घडामोडींवरून नीतेश राणे अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः काही मुद्द्यांवर निलेश राणे यांनी घेतलेली भूमिका आणि त्यावरून निर्माण झालेली परिस्थिती यामुळे बंधूंमधील मतभेद वाढल्याची चर्चा आहे.
