भाजपतर्फे कल्याण पश्चिमेतील उमेदवारांनाही एबी फॉर्मचे वाटप
कल्याण : भारतीय जनता पक्षाकडून कल्याण पूर्वेतील ९ उमेदवारांना ए-बी फॉर्म वाटप केल्यानंतर आता कल्याण पश्चिमेतील उमेदवारांनाही एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये वरुण पाटील, दया गायकवाड, उपेक्षा भोईर, संतोष तरे, मेघा खेमा, जतीन प्रजापती, पराग तेली, अमित धाक्रस, शामल गायकर, हेमा पवार आणि डॉ.पंकज उपाध्याय यांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष रितेश फडके, स्वप्निल काटे आणि अमित धाक्रस यांच्या उपस्थितीत हे फॉर्म वाटप करण्यात आले.
