१७व्या वार्षिक बांसुरी उत्सवाच्या अनुषंगाने होणाऱ्या फ्लूट सिम्फनीसाठी तरुण बांसुरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली तरुण विद्यार्थी व महिला कलाकारांसह तीस बांसुरीवादक मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथे रंगीत तालमी करताना. दोन दिवसीय हा महोत्सव ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (प.) येथे होणार असून समारोपाला १०० बांसुरीवादकांची भव्य सिम्फनी सादर केली जाणार आहे. महोत्सवात पद्मश्री शुभा मुद्गल, मीता पंडित, अदिती भगवत यांचे विशेष कथ्थक सादरीकरण ‘कृष्णप्रिया’, बांसुरीवादक विवेक सोनार यांची प्रस्तुती तसेच पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे मैफिलीतले मास्टरस्ट्रोक्स अनुभवता येणार आहेत. यावर्षीचा पं. हरिप्रसाद चौरसिया लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार २०२६ पद्मभूषण जावेद अख्तर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
