मुंबई : मुंबईत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात रिमझिम पावसाने झाली. मुंबई आणि उपनगरात गुरुवारी पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. हवेत गारठा वाढलेला असतानाच अचानक आलेल्या पावसाने नववर्षानिमित्त फिरायला आणि कामासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. या अवचित पावासामुळे मुंबईतील हवेचे प्रदुषण कमी होण्यास मात्र मदत झाली.

 हवामान केंद्राच्या कुलाबा केंद्रात ९.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली.मुंबईत डिसेंबर महिन्यापासून किमान तापमानात घट झाली होती. हवेतील गारठा कायम असतानाच गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास मुंबई आणि उपनगरात रिमझिम पावसाने हजेरी लावली.
छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसर, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, लालबाग, दादर, घाटकोपर, बोरिवली, मुलुंड आणि आसपासच्या परिसरात पाऊस पडला. तसेच पालघर आणि उत्तर कोकणातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *