शहापूरात शौर्य दिन साजरा
ठाणे : शहापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान प्रतिष्ठानच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त १ जानेवारीला सकाळी ११ वाजता शूर वीरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. यावेळी मानव़ंदना सोहळ्यासाठी शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर ढगे रमाबाई ब्रिगेट संघटनेच्या अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड पोलीस उपनिरीक्षक सतोष उबाळे शहापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट मनोहर सासे बौध्द महासभाचे जेष्ठ पदाधिकारी भरत घनघाव,सजय भालेराव भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा महिला कार्यकारणी तसेच बहुजन वर्गातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान प्रतिष्ठान शहापूर तालुका पदाधिकारी प्रभाकर थोरात,संदीप कांबळे,निलेश विशे,प्रविन वाढविदे, निवुत्ती पाटील,सम्राट पहुरकर, प्रविण सोनवणे,रोहीत पडीत, यांनी विशेष मेहनत घेतली.
