ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्सची विजेतेपदाची हॅटट्रिक
ठाणे: ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित सब ज्युनिअर गटाच्या ठाणे जिल्हा अजिंक्यपदाच्या मैदानी स्पर्धेत तीन नवीन जिल्हा विक्रमासह ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स संघाने सर्वसाधारण विजेतेपदाची हॅटट्रिक साधली आहे. या स्पर्धेत त्यांच्या जिहांश पाटील, अर्णव अय्यर, अवनी अरबत्ती यांनी आपापल्या वयोगटात सर्वोच्च कामगिरी करताना नवीन जिल्हा विक्रम रचले.
जिहांश ने १० वर्षे वयोगटातील ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत ७.७ सेकंदाचा जुना विक्रम मागे टाकत ७.५ सेकंदाचा नवा उच्चांक नोंदवला. याशिवाय जिहांशने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर १२ वर्षे गटात अर्णव अय्यरने १२.५१ मीटर फेक करत गोळाफेकीतील ९.७१ मीटरचा जुना विक्रम पुसून टाकला. ट्रॅक अँड फिल्डसाठी अवनी अरबत्तीने १२ वर्षे गटात गोळाफेकीत तिसरा विक्रम नोंदवला. अवनीनेही गोळाफेकीत ९.७२ मीटरचा जूना विक्रम पुसून टाकताना ११.४९ मीटरचा नवीन विक्रम प्रस्थापित केला.
स्पर्धेतील विजेते : १८ वर्ष गट : इरा कावडे (सुवर्ण – ५० मीटर धावणे, कांस्य – स्टँडिंग जंप), त्रिशीया गाला (सुवर्ण – १०० मीटर). १२ वर्षे वयोगट : स्पृहा नाडकर्णी (कांस्य – गोळा फेक), १० वर्षे वयोगट : मितांश पाटील (सुवर्ण – गोळाफेक), काशवी करंजकर ( रौप्य – ५० आणि १०० मीटर धावणे). स्वानंदी पै ( रौप्य – स्टँडिंग जंप, कांस्य – १०० मीटर धावणे), रुद्रांश राणे (रौप्य – स्टँडिंग जंप, कांस्य – १०० मीटर धावणे), दिती पारकर (कांस्य – ५० मीटर), आर्यविन गौर ( कांस्य – गोळाफेक), युवांश भारद्वाज ( कांस्य – गोळाफेक). ८ वर्षे वयोगट : झैन खान ( कांस्य – १०० मीटर धावणे), हृदित्या कवीश्वर ( सुवर्ण – ५० मीटर , १०० मीटर धावणे). आरवी मोकल ( कांस्य – १०० मीटर).
