महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहा.आयुक्त स्वरुपा परळीकर, प्रशासकीय अधिकारी रवी जाधव व शोभा देशमुख तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदरांजली व्यक्त करीत सकाळी ११.०० वा. ते ११.०२ वा. पर्यंत स्तब्ध उभे राहून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *