माईसाहेब आंबेडकर जयंती समारोहाचे शनिवारी आयोजन

कल्याण : समाज प्रवर्तक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी डॉ. सविता भिमराव आंबेडकर तथा माईसाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शनिवार, ३१ जानेवारी रोजी सायं. ४.३० वाजता कल्याण पश्चिमेतील सितारा हॉटेल समोर, वीज कंपनी कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था कॉ. दत्ता देशमुख सभागृह या ठिकाणी जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी सत्यशोधक शेतकरी सभा, राज्य संघटक कॉम्रेड किशोर ढमाले हे प्रमुख वक्ते असणार आहेत. तर लेखक, साहित्यिक विजय सुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

यावेळी आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह केलेल्या नवविवाहितांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय महिला फेडरेशन, कल्याण, समता संघर्ष संघटना, सकल भारतीय समाज, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, कल्याण, राष्ट्र सेवा दल, कल्याण, ऑल इंडिया युथ फेडरेशन, श्रमिक मुक्ती दल, कल्याण, नागरी हक्क संघर्ष संघटना, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँगेस (आयटक), अनुबंध, पुरोगामी विचारमंच, कल्याण, ऑल इंडिया स्टुडंटस् ऑर्गनायझेशन, डॉ. आंबेडकर मेमोरीयल सोसायटी (ट्रस्ट) आदींनी केली असल्याची माहिती उदय चौधरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *