मोजणी अर्जासाठी ‘हेल्प डेस्क’स्थापन
ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी मोजणी अर्ज दाखल करण्यासाठी ‘मदत कक्ष’ नगर भूमापन अधिकारी ठाणे भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत. यासह नागरिकांना मोफत तांत्रिक सहाय्य कार्यालयांमध्ये मोजणी प्रकरणे “ई-मोजणी आज्ञावली व्हर्जन २.० स्वीकारली जात आहेत. या प्रक्रियेबाबत सर्वसामान्य नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याने अर्ज भरताना अनेक अडचणी येतात. नगर भूमापन कार्यालय ठाणे येथे नागरिकांसाठी ‘मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला असल्याची माहिती नगर भूमापक अधिकारी सिद्धेश्वर घुले यांनी दिली.
या प्रणालीत नागरिकांना अर्जासोबत जमिनीचा  मालमत्ता पत्रक, संबंधित अभिलेख, बिनशेती मोजणीसाठी मंजर रेखांकन आराखडा, पोटहिस्सा मोजणीसाठी (आवश्यक असल्यास स्थानिक स्वराज्य संस्था अथवा नियोजन प्राधिकरणाकडील रेखांकन व ना हरकत दाखला, ओळखीचा पुरावा आदी कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करावी लागतात. मोजणी शुल्काचे चलन करून त्याची पीडीएफ फाईल अपलोड करणे आवश्यक आहे.
या मदत कक्षामधून मोजणी अर्ज भरण्यापासून ते प्रकरण निकाली निघेपर्यत आवश्यक असलेली सर्व मदत नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेमुळे खाजगी यंत्रांकडून नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे. त्यामळे नागरिकांनी मदत कक्षाचा लाभ घेऊन आपले मोजणी अर्ज मोफत भरून घ्यावेत व येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी ठाणे कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *