रविवारी डोंबिवलीत नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या विकासासाठी कार्य करणार्या नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्यावतीने रविवार १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड, देसलेपाडा, डोंबिवली (पूर्व) येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यास ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली व बदलापूरातील सुधागड तालुका रहिवाशांनी मोठÎा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष जयेश ठाकूर यांनी केले आहे.
कल्याण-डोंबिवलीतील सुधागड वासियांच्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी कार्यरत असणारी नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ या संस्थेतर्फे गेल्या ४ वर्षांपासून डोंबिवलीत सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवक, सुधागड तालुक्यातील विविध राजकीय नेते, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित लाभत आहे. यंदाही सुधागडवासियांसह कल्याण-डोंबिवलीकरांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष जयेश ठाकूर यांच्याकडून करण्यात येत आहे.
