बारामती : पुतण्या अजित पवारांच्या निधनाचे दु:ख पचवून शरद पवार आज पुन्हा इन अक्शन आले. ते थेट आज नीरा नदीतील प्रदुषणाची पाहणी करण्यासाठी ते पोहोचले!
अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे स्वतः शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून आलं. बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे थेट नदीकाठी पोहोचले. बारामती शेजारील नीरा वाघज गावात नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी शरद पवारांकडून करण्यात आली.
अनेक वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला होता आणि स्वतः देशाच्या राजकारणात लक्ष घातलं होतं. तेव्हापासून अजित पवार बारामतीच्या समस्यांचे निराकरण करायचे. मात्र, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामतीची सूत्रे स्वतः शरद पवारांनी हाती घ्यायचं ठरल्याचं दिसतंय.

एकीकडे अजित पवारांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी पवार कुटुंबीय बारामती जवळील सोनगावमध्ये पोहचले. त्याचेवेळी शरद पवार मात्र नीरा वाघज गावात प्रदूषित नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचले.

सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार शरद पवारांच्या घरी रात्री महत्वाची मिटींग आयोजित करण्यात आली होती. त्यात सुप्रीया सुळे , रोहीत पवार आणि युगेंद्र पवारही सहभागी झाले होते. सुनेत्रा पवार शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याने आता शरद पवार आणि त्यांचा पक्ष नेमकी काय भुमिका घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *