सी. एन. फाउंडेशनतर्फे शहीद जवानांना मॅरेथॉनद्वारे श्रद्धांजली
कल्याण: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सी. एन. पाटील फाउंडेशन व फेडरेशन ऑफ ऑरगन डोनेशन तर्फे शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर व इतर शहीद जवानांना श्रद्धांजलीसाठी मॅरेथॉन आयोजित केली होती. या तीसऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत कल्याण, ठाणे व इतर जिल्ह्यातील युवक युवती, शाळेतील, कॉलेजमधील विद्यार्थीनी व पालक शिक्षक, कल्याण मधील सर्व पोलीस स्टेशनचे काही पोलीस बांधव, त्यांची मुले आदीजण सहभागी झाल्यामुळे ३०००वर लोकांनी मॅरेथॉनचा आनंद घेतला.
आतापर्यंत सी. एन. पाटील फाउंडेशन व सलंग्न संस्थांनी ११ शहीद जवानांच्या नातेवाईकांना कल्याण मध्ये बोलवून सत्कार करून आर्थिक मदत केली आहे. कार्यक्रमासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, खडकपाडा पोलीस स्टेशन व.पो.नि. डॉ. अमर वाघमोडे, माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेविका हेमलता पवार, नगरसेवक वरुण पाटील, मच्छिंद्र जाधव, डॉ. प्रशांत पाटील, श्रीकांत फुलवणे, डॉ. कोमल भोईर, एन पी अय्यर व सी एन पाटील फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी मदत केली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले.
