ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुताम्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह ठाणे महापालिकेतील विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
