Month: January 2026

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राची पदक अष्टमी, सागरी जलतरणात उपविजेतेपद दीव ः  खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राने 3 रौप्य,  5 कांस्यपदकांसह 8 पदकांची लयलटू केली आहे. साताऱ्याच्‍या दीक्षा यादव पदकाचा डबल धमाका केला. दीक्षाच्‍या १ रौप्‍य व १ कांस्य पदकामुळे सागरी जलतरणात महाराष्टाने उपविजेतेपद पटकावले. दीवमधील अरबी समुद्रातील  सागरी जलतरणाचा महाराष्ट्राच्‍या मुलींनी पदकाचा करिश्मा घडविला. साताऱ्याच्‍या दीक्षा यादवे ५ किमी शर्यतीत रौप्‍य तर १० किमी शर्यतीत कांस्य पदक पटकावले. सलग दुसऱ्या वर्षी दीक्षाने दोन्‍ही शर्यतीत पदकाचा पराक्रम केला आहे. या यशामुळे सागरी जलतरणातील महिलांचे  उपविजेतपद महाराष्ट्राने संपादन केले. कर्नाटकला विजेतेपदाची तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा करंडक पथकप्रमुख नवनाथ फरताडे  यांच्‍या हस्‍ते देण्यात आला. दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर  दुसर्‍या खेलो इंडिया बीच स्‍पर्धेचा थरार रंगला.  सागरी जलतरणाच्या जोरावर कर्नाटकाने सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकविला. तामिळनाडूने स्‍पर्धेत दुसरे तर मणिपूरने तिसरे स्थान संपादन केले. या तिन्‍ही संघानी प्रत्‍येकी 3 सुवर्ण, 2 रौप्य पदके जिंकल्‍याने सर्वसाधारण विजेतेपदाचा फैसला कांस्य पदकावर घेण्यात आला. 3 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्यपदकाची लयलूट करीत कर्नाटकाने  स्‍पर्धेत बाजी मारली. स्‍पर्धेत महाराष्ट्राचे ७७ जणांचे पथक सहभागी झाले होते.  या्मध्ये ३१ पुरूष व २८ महिला खेळाडूंचा समावेश होता. स्‍पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. महाराष्ट्राने 3 रौप्य,  5 कांस्यपदकांसह 8 पदकांची कमाई केली आहे. बीच पेंचक सिलट स्‍पर्धेत २ रौप्‍य व १ कांस्य पदके महाराष्ट्राच्‍या नावापुढे झळकली. बीच कबड्डी दोन्‍ही संघाना तर बीच सॉकरमध्ये पुरूष संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सर्व पदकविजेत्‍यांचे क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी, उपसंचालक संजय सबनीस यांनी अभिनदंन केले आहे. सर्व पदकविजेत्‍यांचे कौतुक करीत सहसंचालक सुधीर मोरे यांनी सांगितले की खेलो इंडिया बीच स्पर्धा ही खेळाडूंसाठी मोठी पर्वणी ठरली. स्‍पर्धेच्‍या दुसऱ्या पर्वातही महाराष्ट्राची चमकदार कामगिरी केली आहे.

जॉली जिमखाना कॅरम – विश्व् विजेत्यांची आगेकूच

जॉली जिमखाना कॅरम – विश्व् विजेत्यांची आगेकूच विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मुंबई उपनगरच्या विश्व् विजेत्या संदीप दिवेने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढती नंतर मुंबई उपनगरच्या जावेद शेखवर पहिला सेट १९-२० असा गमावल्यानंतर दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे २५-१४ व २५-८ असा जिंकून पाचव्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या सेटमध्ये चौथ्या बोर्डात संदीपने ब्लॅक स्लॅम नोंदवला. दुसरीकडे मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने मुंबईच्या जाधवचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवत आगेकूच केली. स्पर्धेच्या चौथ्या फेरी अखेरीस २० व्हाईट स्लॅम व २ ब्लॅक स्लॅमची नोंद करण्यात आली आहे. पुरुष एकेरी चौथ्या फेरीचे निकाल  पुढील प्रमाणे. झैदी अहमद फारुकी ( ठाणे ) वि वि अनंत सुर्वे ( मुंबई ) २५-८, २५-६ विकास धारिया ( मुंबई ) वि वि अजगर शेख ( मुंबई उपनगर ) २५-१, २५-१ रवींद्र हांगे ( पुणे ) वि वि मिहीर शेख ( मुंबई ) १९-१३, २५-६ स्वप्नील गोलतकर ( मुंबई ) वि वि जयचंद बेतवंशी ( मुंबई ) २५-१९, २३-१२ संजय मोहिते ( मुंबई ) वि वि  कुणाल राऊत ( मुंबई ) २३-१९, २५-२० महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि हिदायत अन्सारी ( मुंबई ) २०-३, २५-० योगेश परदेशी ( पुणे ) वि वि नरसींग राव सकारी ( मुंबई उपनगर ) २५-१५, २५-४ प्रफुल मोरे ( मुंबई ) वि वि विश्वजीत भावे ( ठाणे ) २५-१०, २५-४ निलांश चिपळूणकर ( मुंबई ) वि वि मंगेश पंडित ( मुंबई उपनगर ) २५-४, २५-१२ संदीप देवरुखकर ( मुंबई ) वि वि अश्रफ खान ( रायगड ) २२-९, २५-७ दिनेश केदार ( मुंबई ) वि वि सुधीर शिंदे ( ठाणे ) २५-०, २१-१० दीपक गनिका ( ठाणे ) वि वि हेमंत पांचाळ ( मुंबई ) ११-२५, १९-१६, १७-१२

तेलंगणात खो-खोचा रणसंग्राम!

तेलंगणात खो-खोचा रणसंग्राम! ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पहिल्याच दिवशी तेलंगणा, आसाम, मध्यभारत, राजस्थान, हरयाणा व विदर्भाची दमदार विजयी सलामी काझीपेठ, तेलंगणा : रेल्वे ग्राऊंडवर सुरू असलेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपमध्ये आज खेळ, वेग, चपळाई आणि डावपेचांचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने तेलंगणा खो-खो असोसिएशन आयोजित या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील सामन्यांनी चांगलीच रंगत आणली. महिलांमध्ये तेलंगणा व आसाम, तर पुरुषांमध्ये विदर्भ व हरियाणा संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने मात करत आपले वर्चस्व ठसठशीतपणे सिद्ध केले. महिला गट : यजमान तेलंगणाचा जल्लोष : ऑल इंडिया पोलिसवर निर्विवाद विजय यजमान तेलंगणा संघाने महिला गटातील लढतीत ऑल इंडिया पोलिसचा २८–८ असा एक डाव २० गुणांनी सहज पराभव करत गटात पहिला विजय नोंदवला. तेलंगणाकडून अखिला (३.१० मि. संरक्षण व २ गुण) आणि अनुषा के. (२.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी सलग दमदार कामगिरी नोंदवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. तर पोलिस संघाकडून रमणदीप कौर (१.२० मि. संरक्षण, २ गुण) हिने चांगला प्रतिकार केला. महिला गट : आसामची धडाकेबाज सुरुवात : जम्मू-काश्मीरवर एकतर्फी मात महिला गटातील सामन्यात आसामने जम्मू-काश्मीरचा एक डाव २० गुणांनी (२८–८) सहज पराभव केला. आसामकडून रांजणा (३.१० व १.३० मि. संरक्षण, २ गुण) आणि कल्याणी (५.१० मि. संरक्षण) यांनी भक्कम संरक्षण करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली, तर जम्मू-काश्मीरकडून रूची माला (१.२० व १.४० मि. संरक्षण, ४ गुण) हिने झुंजार खेळ केला. मध्यभारतचा झंझावात : बिहारवर मोठ्या फरकाने विजय आणखी एका सामन्यात मध्यभारत संघाने बिहारचा एक डाव ३६ गुणांनी (४०–४) धुव्वा उडवला. मध्यभारतकडून रोहिणी (२.२० व ३.५० मि. संरक्षण, ६ गुण) आणि ईरा भट्ट (४.४० मि. संरक्षण) यांनी अप्रतिम खेळ करत सामन्यावर संपूर्ण वर्चस्व गाजवले. पुरुष गट : विदर्भाची गोव्यावर एकतर्फी विजय पुरुष गटात विदर्भ संघाने आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ करत गोव्याचा ३८-४ असा  ३४ गुण व एक डाव राखून धुव्वा उडवला. विदर्भकडून दिलराज सिंग (२.५० मि. संरक्षण व ८ गुण) याने आक्रमणात आघाडी घेतली, तर फैजल खान (३.४० मि. संरक्षण व २ गुण) याने संयमी खेळ करत संघाच्या मोठ्या विजयात भर घातली. तर गोव्याकडून रौश (१ मि. संरक्षण, २ गुण) याने चांगले प्रदर्शन केले. पुरुष गट : हरियाणाची निर्णायक झेप दुसऱ्या पुरुष सामन्यात हरयाणाने हिमाचल प्रदेशचा ३४–२४ असा १० गुणांनी पराभव केला. मध्यंतराला २ गुणांनी पिछाडीवर (१२–१४) असतानाही हरयाणाने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करत २२ गुणांची कमाई केली. हरयाणाकडून ध्रुव (१.४२ मि. संरक्षण, १० गुण) आणि गौरव (२.१० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी निर्णायक कामगिरी केली, तर हिमाचलकडून शिवम (२ मि. संरक्षण, ६ गुण) आणि ललित (१.२० मि. संरक्षण, ८ गुण) यांनी चांगला खेळ केला. राजस्थानची विजयी घोडदौड : चंदिगडवर मात पुरुष गटात राजस्थानने चंदिगडचा एक डाव ९ गुणांनी (२५–१६) पराभव केला. राजस्थानकडून मनिष (३.१० मि. संरक्षण, २ गुण) आणि हरिष (२.१० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तर चंदिगडसाठी दीपक सिंग (४ गुण) आणि संदीप कुमार (२.२० मि. संरक्षण) यांनी झुंज दिली.

अमर हिंद मैदानावर ‘खो-खो’चा महायज्ञ

अमर हिंद मैदानावर ‘खो-खो’चा महायज्ञ थरार, चपळाई आणि इतिहासनिर्मितीचा संगम! मुलींच्या गटात रा. फ. नाईकची सरशी, मुलांच्या गटात ज्ञानविकास विद्यालयाची ऐतिहासिक बाजी मुंबई . दादरच्या अमर हिंद मातीत च्या उसळले खो-खोचे रण. धुळीचे लोट उडवत, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पकडी, सेकंदाच्या फरकाने दिलेल्या हुलकावण्या आणि प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा खेळ दादरच्या ऐतिहासिक अमर हिंद मंडळाच्या मैदानावर आंतरशालेय खो-खो स्पर्धेने अक्षरशः क्रीडाप्रेमींना वेड लावले! कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत मुंबई, उपनगर व ठाण्यातील २७ शाळांनी सहभाग नोंदवत खो-खोची परंपरा, वेग आणि डावपेच यांचा अप्रतिम संगम सादर केला. प्रत्येक सामना म्हणजे जिद्दीची चाचणी आणि कौशल्याची कसोटी ठरली. उद्घाटनाचा मंगल शंखनाद. प्रेरणेची स्फूर्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन अमर हिंद मंडळाचे माजी राज्यस्तरीय व विद्यापीठीय खेळाडू तसेच सध्या ॲक्सिस बँकेत कार्यरत असलेले अमित चिखलकर यांच्या हस्ते झाले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी खेळाडूंमध्ये नवी ऊर्जा संचारली. स्पर्धेत १२ मुलींचे व १५ मुलांचे संघ विजयाच्या ध्यासाने मैदानात उतरले. मुलींचा अंतिम रणसंग्राम , रा. फ. नाईकचे वर्चस्व मुलींच्या अंतिम सामन्यात रा. फ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे विरुद्ध ज्ञानविकास विद्यालय, ठाणे यांच्यात चुरशीची लढत झाली. रा. फ. नाईकने ९–५ असा १ डाव राखून ४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. श्रुती चोरमारे (४ मि. संरक्षण व ३ गुण) वैष्णवी जाधव (४ मि. संरक्षण व ३ गुण), प्रणिती जगदाळे (२.३० मि. संरक्षण १ गुण) अशी सलग व ठोस कामगिरी नोंदली. पराभूत ज्ञानविकासकडून समृद्धी कदम (१.३० मि. संरक्षण व १ गुण), प्रांजल पाटे (१.३० मि. संरक्षण व १ गुण), श्रावणी मोरे (१.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी झुंज दिली; मात्र रा. फ. नाईकच्या आक्रमणापुढे त्यांचा निभाव लागला नाही. मुलांचा थरार . ज्ञानविकासची ‘किंगमेकर’ बाजी मुलांच्या अंतिम सामन्यात ज्ञानविकास विद्यालय, ठाणे संघाने महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे संघावर १०–७ असा १ डाव राखून ३ गुणांनी विजय मिळवला. ज्ञानविकासच्या साहिल शिंदे (२.२० मि. संरक्षण व २ गुण), विनायक भणगे (३.५० मि. संरक्षण व १ गुण), साईराज बैकर (२.१० मि. संरक्षण व २ गुण), सार्थक वांगडे (३.५० मि. संरक्षण व १ गुण) अशी निर्णायक कामगिरी नोंदवली. तर पराभूत महात्मा गांधी विद्यामंदिरच्या तन्मय पूजारे (१ मि. संरक्षण व २ गुण), बाळकृष्ण हरळे (१.४० व १.१० मि. संरक्षण), संदेश गोमणी (१.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेला लढा कौतुकास्पद ठरला. सन्मानाचा क्षण . विजेत्यांचा गौरव…

 महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार!

महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार! ५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज! मुंबई उपनगरचा निहार दुबळे व पुण्याची रितिका राठोड कर्णधारपदी पुणे : अस्सल मराठी मातीतील खेळ असलेल्या खो-खोचा रणसंग्राम आता तेलंगणाच्या भूमीत पेटणार असून महाराष्ट्राची फौज जेतेपदाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. काजीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राउंडवर ११ ते १५ जानेवारी,  दरम्यान होणाऱ्या ५८ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले आहेत. हे संघ सहभागापुरते नसून जेतेपदावर दरारा निर्माण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. प्रशिक्षण शिबिरातून आत्मविश्वासाचा नवा जोश स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजश्री शाहू कन्या शाळेच्या मैदानावर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस प्रा. जनार्दन शेळके व सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काजीपेठ, तेलंगणा येथे रवाना झाले. गटवारीचा थरार : ‘अ’ आणि ‘ब’ गटात महाराष्ट्र सज्ज भारतीय खो-खो महासंघाच्या गटवारीनुसार पुरुष संघ ‘ब’ गटात असून उत्तर प्रदेश, मणिपूर, जम्मू–काश्मीर व मेघालय यांच्याशी लढत देणार आहे. महिला संघ ‘अ’ गटात असून उत्तर प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश व चंदीगड ही आव्हाने असतील. दोन्ही गटांत फेव्हरेट म्हणून महाराष्ट्र आपली ताकद दाखवणार आहे. पुरुष संघ : अनुभव, वेग आणि आक्रमणाची संगत कर्णधार : निहार दुबळे (मुंबई उपनगर) यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघात अनुभवाची भक्कम फळी आहे. संघात शुभम थोरात, प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, रुद्र थोपटे (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, निहार दुबळे (कर्णधार), प्रतिक देवरे, ऋषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), विजय शिंदे, सचिन पवार (सर्व धाराशिव), अक्षय मासाळ, अभिषेक केरीपाळे (सर्व सांगली), शुभम उतेकर (ठाणे), वेदांत देसाई (मुंबई), तुकाराम कारंडे (बीड) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक : डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), सहाय्यक प्रशिक्षक : अजित शिंदे (सोलापूर), व्यवस्थापक : प्रफुल हाटवटे (बीड) अशी मार्गदर्शक फळी आहे.…

डंपरच्या धडकेत मुलुंड रहिवाशाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत मुलुंड रहिवाशाचा मृत्यू आमदार मिहिर कोटेचा यांची बीएमसीच्या उपमुख्य अभियंता नवनाथ घाडगे यांच्या निलंबनाची मागणी मुंबई: मुलुंडमध्ये डंपरच्या धडकेत एका रहिवाशाचा मृत्यू झाल्यानंतर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी…

 प्लॅस्टिक व चिनी मांजाविरोधात ठाणे महापालिकेची कडक कारवाई

प्लॅस्टिक व चिनी मांजाविरोधात ठाणे महापालिकेची कडक कारवाई ६ दिवसांत ५३ हजार रुपयांचा दंड ठाणे: पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा चिनी मांजा, चिनी दोरा तसेच नायलॉन व प्लास्टिकपासून (सिंथेटिक) तयार करण्यात…

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया; २०२६–२७ साठी पहिला टप्पा सुरू

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया; २०२६–२७ साठी पहिला टप्पा सुरू अनिल ठाणेकर ठाणे: शिक्षण हक्क कायदा (Right to Education – RTE) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित…

पर्यटकांसाठी सुलभ शौचालय ताबडतोब सुरू करावीत

पर्यटकांसाठी सुलभ शौचालय ताबडतोब सुरू करावीत पर्यटकांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान: केवळ पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इथल्या सर्वच व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल इंडस्ट्री,लॉज धारक, सर्वसामान्य स्टॉल वाले, हमाल,मजूर, रिक्षावाले, घोडेवाले या सर्वांचा…

 मतदानाची शपथ घेत मतदार जनजागृती सायकल रॅली संपन्न                                                     

मतदानाची शपथ घेत मतदार जनजागृती सायकल रॅली संपन्न रॅलीला सायकल प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरात मतदार जनजागृतीसाठी व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा…