Month: January 2026

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी २0२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात आकस्मिक झालेल्या दु:खद निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. ऐकल्यानंतर विश्वास बसणार नाही अशी सर्वांना नि:शब्द करुन टाकणारी ही दुर्दैवी घटना प्रत्येकाला सुन्न करुन टाकणारी होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करुन, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, सर्व विभागप्रमुख व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागत नागरिक यांच्या उपस्थितीत स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान असणा-या अजितदादा पवार यांच्यासारख्या महनीय नेतृत्वाच्या अचानक निधनामुळे महाराष्ट्राची व प्रशासनाची फार मोठी हानी झाली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती लाभो अशा शब्दात श्रध्दांजली अर्पण केली. आयकॉनिक इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या पायाभरणीपासून उभारणीपर्यंत तसेच महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांना गती देण्यात व अनेक प्रसंगी त्यांचे योगदान लाभले जे कधीही विसरता येणार नाही असे आयुक्त म्हणाले. मंत्रालय सेवेत असतांना त्यांच्या कामाची पध्दत जवळून पाहता आली. साता-यामध्ये काम करताना त्यांचे मार्गदर्शन लाभले. कोव्हीड काळात पालघरचा जिल्हाधिकारी असतांना मोठया प्रमाणावर कामगार आपल्या गावी स्थलांतर करीत होते अशा वेळी आवश्यक प्रसंगी रात्री २ वाजताही त्यांच्याशी बोलणे झाले व त्यांनी लगेच मदतही केली. सिडकोत असतांनाही त्यांचे विविध गोष्टींमध्ये मार्गदर्शन मिळाले अशा विविध ठिकाणच्या आठवणी आयुक्तांनी कथन केल्या. दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह निधन झालेले त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट कॅ. सुमित कपूर, कॅ. शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्याही आत्म्यास चिरशांती लाभो अशी सामूहिक प्रार्थना करत सर्वांनी स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

गांधीहत्या झाली, पण गांधीविचार अजरामर – राजन राजे

गांधीहत्या झाली, पण गांधीविचार अजरामर – राजन राजे ठाणे : ३० जानेवारी — अहिंसेचे पुजारी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची याच दिवशी एका अधम प्रवृत्तीच्या माथेफिरूने कट रचून निर्घृण हत्या केली.…

 पं.दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेच्या नुतनीकरणाचे अर्ज सादर करा

पं.दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेच्या नुतनीकरणाचे अर्ज सादर करा तेजस्विनी गालांडे यांचे आवाहन अशोक गायकवाड अलिबाग: रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना २०२५-२६ करीता नुतनीकरणाचे अर्ज सादर केलेले नाहीत, अशा पात्र विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे नुतनीकरणाचे अर्ज ३१ जानेवारीपर्यंत http://swayam.mahaonline.gov.in/, या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण तेजस्विनी गलांडे यांनी केले आहे. ३१ जानेवारी पर्यंत नुतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास प्राप्त न झाल्यास त्यांच्या जागी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात गुणवत्ता यादीव्दारे निवड झालेली आहे व त्यांना वसतिगृहाकडून आवेदन पत्रे निर्गमित झालेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच प्रवेश घ्यावा, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वयंम योजनेत हस्तांतर करण्यात येणार नाहीत.

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक ‘सलामी ‘ मुंबई -प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात असणाऱ्या जिगरबाज जवानांची करमणूक करण्याची धाडसी संकल्पना २००२ साली सफरसम्राट दिवंगत…

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष

चार किलोमीटर लांब अनंत साडीतून लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष रमेश औताडे मुंबई : रेड डॉट फाउंडेशन या संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेतर्फे महिलांचा सन्मान आणि न्याय यांचे प्रभावी प्रतीक म्हणून साकारलेल्या अनंत साडी चे अनावरण करण्यात आले. भारतीय दंड संहितेतून वैवाहिक बलात्काराला दिलेली कायदेशीर सूट रद्द करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नामवंत फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांनी या अनंत साडीची रचना केली असून, ही साडी म्हणजे न्यायाची मागणी करणाऱ्या शेकडो स्वाक्षऱ्या असलेली, भरतकाम आणि खास प्रिंट असलेली ही प्रतीकात्मक याचिका आहे. साडी वरील प्रत्येक स्वाक्षरी ही धैर्याचा एक धागा आहे आणि या साडीच्या पदराची प्रत्येक नीरी म्हणजे महिलेला निवड करण्याचा आणि मौन बाळगण्यास नकार देण्याचा अधिकार आहे. असे रेड डॉट फाउंडेशनच्या सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत के. सिंग म्हणाल्या. डिझायनर निवेदिता साबू म्हणाल्या, “संस्कृतीच्या माध्यमातूनच संस्कृतीला आव्हान देत परिवर्तन घडवण्याचे काम हि साडी करते. सध्याच्या कायद्यानुसार १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पत्नीशी संमतीशिवाय केलेले लैंगिक संबंध बलात्कार म्हणून ओळखले जात नाहीत. परिणामी कोट्यवधी विवाहित महिलांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही. काळा घोडा कला महोत्सवात या अनंत साडीचे प्रदर्शन एल्फिन्स्टन महाविद्यालय येथे ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे.

 कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा!

कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा! नाशिकमध्ये ४ फेब्रुवारीला जनआक्रोश मोर्चा हरिभाऊ लाखे नाशिक – प्रजासत्ताक दिन सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ चार फेब्रुवारी रोजी शिव-फुले-शाहू आणि आंबेडकरी विचारांच्या नागरिकांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी येथील पोलीस कवायत मैदानावरील कार्यक्रमात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नव्हता. यावर वनरक्षक माधवी जाधव यांनी जाहीर आक्षेप घेतल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. संविधान निर्माण करणाऱ्यांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कसे विसरलात, असा प्रश्न जाधव यांनी करीत महाजन यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अनवधानाने नाव राहिल्याबद्दल मंत्री महाजन यांनी दिलगिरीही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, शिव-फुले-शाहू आणि आंबेडकर विचारांच्या…

 राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली

जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रध्दांजली मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने एक धैर्यशील,प्रगती आणि जनकल्याणाचा ध्यास असलेले नेते हरपले, महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे,अशा भावपूर्ण शब्दात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी काल दुर्दैवी विमान अपघातात निधन पावलेले महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज शो व्यक्त ठरावाद्वारे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.रा.मि.म.संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यानी बारामतीला जाऊन स्व.अजितददाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यूजीसीचा सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा

यूजीसीचा सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी लागू केलेले नवीन नियम म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर लादलेला कायदा योग्य नसून तो तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी ब्राह्मण सेवा फाउंडेशनने केली आहे. शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रयोग थांबवावेत, असेही संघटनेने स्पष्ट केले. या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अ‍ॅड. राहुल उपाध्याय आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनजी यांनी संयुक्त निवेदन जारी करून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.  भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच लागू करण्यात आलेल्या नव्या विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी नियमांना जे माध्यमांमध्ये यूजीसी समानता / भेदभाव विरोधी नियम म्हणून ओळखले जात आहेत) तात्पुरती स्थगिती दिली आहे. याचा अर्थ असा की हे नवे नियम सध्या अंमलात आणता येणार नाहीत आणि पुढील आदेश येईपर्यंत ते लागू राहणार नाहीत. विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद न साधता घेतलेले निर्णय अस्वीकार्य असून त्यामुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेने केला. संविधानाने दिलेले समान संधीचे अधिकार अबाधित ठेवावेत आणि उच्च शिक्षण क्षेत्राला राजकारणापासून पूर्णतः मुक्त ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यूजीसी धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असून त्यावर कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारला जाणार नाही, असा इशाराही ब्राह्मण सेवा फाउंडेशनने दिला आहे.

रेशनिंग धान्य काळाबाजाराला पूर्णविराम कधी?

रेशनिंग धान्य काळाबाजाराला पूर्णविराम कधी? प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला टोकावडे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलीसांनी पकडला आहे. त्यामुळे रेशनिंगच्या धान्याच्या काळ्याबाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्तीवेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली असता, एम. एच १४ – सि. पी ७3४७ या ट्रकमध्ये रेशनिंग धान्य असल्याचे दिसून आले. ट्रक चालकाकडे बिलाची मागणी केली असता साध्या कागदावरच बिल आढळून आले, धान्य मालकाशी संपर्क साधला असता तेव्हा उडवा उडवीची उत्तरे मिळाली. धान्य व्यापाराकडे धान्य व गव्हाचे परवाना नसल्याचे समजले, तसेच अधिक माहिती घेतली असता ट्रक शहापूर शेनवे येथून जुन्नर कडे काळया बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे प्रथमदर्शनी समजले. त्यामुळे पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला आहे. टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली असता तहसीलदार कार्यालय मुरबाड यांना याबाबत पत्र देऊन कळविले आहे अशी माहिती मिळाली. पुरवठा निरीक्षक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनामा केला आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते व रेशनिंगचा काळा बाजार आता तरी थांबेल का? असा सवाल करत आदिवासी क्रांति सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी मा . जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्याकडे करणार असल्याचे आमच्या दै, बित्तंबातमीचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन ८ फेब्रुवारी रोजी बोरीवली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई: चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली यांचे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ज्येष्ठालय सभागृह, बाभई, बोरीवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले आहे. या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात  वित्तीय गुंतवणूकविषयक व्याख्यान तसेच ज्ञातीतील कलाकारांचा ‘गीतों का कारवाँ ‘ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.  विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्ञातीतील ज्येष्ठ बंधु-भगिनींचा सत्कार आणि कला – क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा सत्कार अशी या सर्वसमावेशक कार्यक्रमाची रूपरेषा आहे.  वधू – वर सूचक मंडळांतर्गत नावनोंदणी तसेच संस्थेच्या नवीन सभासदांची नोंदणी याप्रसंगी करण्यात येणार आहे. या स्नेहसंमेलनास सर्व ज्ञाती बंधु – भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली या संस्थेचे कार्यवाह उदय मथुरे, (९८२१०९९६०५) यांनी केले आहे.