अल्काराजचा करियर ग्रँडस्लॅमचा विक्रम !

मेलबॉर्न : स्पेनचा युवा टेनिस स्टार कार्लोस अल्काराज याने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ चे विजेतेपद जिंकत सर्वात कमी वयात करीयर ग्रँडस्लॅम पुर्ण करण्याचा नवा इतिहास रचला. अंतिम सामन्यात अल्काराजने अनुभवी नोवाक जोकोविच यांचा २-६, ६-२, ६-३, ६-४ असा पराभव करीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. जोकोविचला २५ व्या ग्रँण्डस्ल विजेतपदाने पुन्हा हुलकावणी दिली.

या विजयासह अल्काराजने आपला सातवा ग्रँड स्लॅम किताब जिंकला आणि त्याचबरोबर करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा इतिहासातील सर्वात कमी वयाचा पुरुष खेळाडू बनला. त्याने तब्बल ८८ वर्षांपूर्वीचा डॉन बज यांचा विक्रम मोडीत काढला. डॉन बज यांनी २२ वर्षे ३६३ दिवसांच्या वयात करिअर स्लॅम पूर्ण केला होता, तर अल्काराजने हे यश २२ वर्षे २७२ दिवसांच्या वयात मिळवले.

कार्लोस अल्काराजपूर्वी डॉन बज, रॉड लेवर, रॉय एमर्सन, आंद्रे अगासी, रॉजर फेडरर, राफेल नडाल आणि नोवाक जोकोविच यांनी करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण केला आहे. एका खेळाडूने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबलडन आणि यूएस ओपन हे चारही प्रमुख स्पर्धांचे विजेतेपद मिळवणे म्हणजे करिअर ग्रँड स्लॅम होय.

कार्लोस अल्काराजचा करिअर ग्रँड स्लॅम

अल्काराजने यापूर्वी यूएस ओपन – २०२२, विंबलडन – २०२३, २०२४, फ्रेंच ओपन – २०२४, २०२५ , ऑस्ट्रेलियन ओपन – २०२६ असे चारही ग्रँड स्लॅम जिंकून करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *