एका दगडात किती पक्षी ? !
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची ख्याती यासाठी होती. ते जेंव्हा एखादी राजकीय हालचाल करायचे, धक्कादायक निर्णय घ्यायचे, तेंव्हा त्यांचे “लक्ष्य” काहीतरी निराळेच असायचे! दिसताना ते एक साधी नियुक्ती करताना दिसायचे, पण प्रत्यक्षात त्या नियुक्तीमुळे अन्य चार लोकांची संधी हुकलेली असायची. दुसऱ्या दोघांना त्यांची “योग्य जागा” दाखवलेली असायची! नेमका तसाच काहीसा प्रकार परवा घडला. मात्र त्या साऱ्या निर्णय प्रक्रियेचे सूत्रधार थोरले पवार नव्हते, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे होते. सुनेत्रा अजितराव पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, ही घटना अनेकांसाठी धक्कादायक, कित्येकांसाठी कदाचित दुःखदायक आणि काहीजणांच्या राजकारणाची घडी विस्कटून टाकणारी अशी होती…! तेर गावी, उस्मानाबाद जिल्हयात, 1963 साली जन्मलेल्या सुनेत्रा अजित पवार या अर्थखात्याच्या पदवीधर आहेत. पण त्या राज्याच्या अर्थमंत्री नाही झाल्या. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क हे राज्याच्या महसुलात भर टाकणारे महत्वाचे खाते आले आहे. हेच खाते अजित पवार गेली काही वर्षे सांभाळत होते. शिवाय माणिकराव कोकाटेंची गच्छंती राज्य मंत्रीमंडळातून झाल्या पासून युवक व क्रीडा ही खातीही दादांकडेच होती ती तीन्ही खाती आता सुनेत्रा वहिनींकडे आली आहेत. हा शपथविधी दादांच्या मृत्युनंतर चौथ्या दिवशी, का व कसा झाला याच्या अनेक सुरस कहाण्या सध्या राजकीय वर्तुळात रंगवल्या जात आहेत. अजित पवारांच्या भीषण अपघाता नंतर दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर एक पानभर शोकसंदेश झळकला होता. भावपूर्ण आदरांजली अशा शब्दात काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील दादांचा एक रेखीव छायाचित्र त्यात होते आणि खाली लहान अक्षरात एकच नाव होते : “भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य”. दादा महायुतीतील सहभागी पक्ष होते. पण एखाद्या प्रादेशिक राजकीय पक्षाचा प्रमुख नेता निवर्तल्यानंतर तिसऱ्याच राष्ट्रीय पक्षाने इतकी मोठी जहिरात राज्यात सर्वत्र करावी हा अनोखा व अलिकडच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग महाराष्ट्राने पाहिला. अनुभवला. तिथेच भाजपाची पावले लक्षात येत होती. पंतप्रधान स्वतः अंत्यसंस्कारात सहभागी होतील असे आदल्या दिवशी सांगितले गेले होते, त्यातून अजितदादंचे तायंच्या पक्षाचे भाजाप प्रणित राष्टरीय लोकशाही आघाडीसाठी असलेले महत्व अधोरेखित होते. प्रत्यक्षात पीएम बारामतीला आले नाहीत. पण देशाचे गृहमंत्री व राजकारणातील धुरंधर, अमित शहा हे आले. त्यांच्या समवेत भाजपाचे नव्याने राष्ष्ट्रीय अध्यक्ष बनलेले नितीन नबीन हेही प्रथमच महाराष्ट्रात अवतरले. भाजपा शासित राज्यातील एनडीएच्या घटक पक्षांचे नेते आले. मंत्री आमदार खासदार असे सारेच व्हीआयपी बारामतीत येऊन गेले. शरद पवार शोकाकुल स्थितीत समोर बसले हते. सुनेत्रा पवार यांच्या भोवती घरातील अन्य महिला वर्ग, पवार कुटुंबीय दिसत होते. त्यातही सुप्रिया सुळेंच्या हालचाली उठून दिसत होत्या. अमित शहांनी अंत्यदर्सन घेतेल व कंद्र सरकार्चायवतीने सन्मानपूर्वक पुष्पचक्र अर्पण केले त्यनंतर पटेल यांनी पार्थ व जय पवार यांची भेट तिथे शहांबरोबर घडवली. निघण्यासाठी वळलेले शहा, थांबून पार्थ यांच्याशी काही बोलतानाही तेंव्हा महाराष्ट्राने लाईव्ह टीव्ही चॅनेलवरून न्याहाळले! त्या सर्व छोट्या मोठ्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर परवाचा शपथविधी पाहता येतो. राज्य सरकारने दादा गेले त्याच दिवशी तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. तो संपल्या नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 31 जानेवारी रोजी सायंकाळी सुनेत्रा विहिनींनी लोकभवन, राजभवनाचे नवे नाव, येथे एका साध्या, छोटेखानी समारंभात, उपमुख्यमंत्री म्हणून पवार परंपरेनुसार गांभिर्यपूर्वक पदाची तसचे गोपनियतेची शपथ घेतली. हा घटनाक्रम थोरल्या पवारांसाठी तसेच त्यंच्या रा.काँ.श.प. पक्षातील नेत्यांसाठी चांगलाच धक्कादायक ठरला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बुद्धीबळाचा पट पवारसाहेब नव्याने मांडणार होते. तो पाटच अचानक उधळला गेला. पवारांवर मात करणारा एक नागपुरी पैलवान हे डावपेच खेळून गेला. जर सारी प्यादी थोरल्या पवारांच्या मनासारखी हालली असती तर दादांच्या नंतर पदावर व खात्यावर शरदरावांचे सहकारी जयंत पाटील यांची वर्णी लागली असती! ते काहीच होऊ शकले नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही थोरल्या पवारांची इच्छा होती. तसे त्यांचे प्रयत्नही होते, हेही दादांच्या निधनानंतर चोवीस तासातच स्पष्ट झाले. पण तेही सारे डाव आता थबकले. थांबले आहेत. इतके सारे परणाम भाजपाच्या एक कृतीने घडले. त्यांनी घाई केली. कदाचित अमित शहांनी फडणवीसांना त्वरा करण्याचा कानमंत्रही दिला असेल. शपथविधी पर्यंतचा सारा घटनाक्रम नीट हपाहण्यासारखा आहे. त्या दरम्यांन रा.काँ.श.प. नेत्यांनी काही पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांच्या आमदारांनी सांगितले की, आणखी काही दिवस थांबायला काय हरकत होती, थोरल्या पवरांचे मित्र संजय राऊतांनी शपथविधीच्या घाईसाठी अमित शहांवर ठेवलेल्या ठपका वगैरेमधून अनेक कहाण्या लक्षात येतात. शरद पवारांच्या हातात हुकुमाचे पत्ते येण्याच्या आधीच प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे व भुजबळांनी पुढाकार घेतला. हे सारे नेते धनंजय मुंडेंच्या बरोबर वर्षा बंगल्यावर 30 जानेवारीला सकाळीच पोचले. तिथे चर्चा झाल्या. ती बैठक संपल्या नंतर भुजबळांनी जाहीर केले की नवा नेता निवडण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक 31 ला सकाळी घेतली जात आहे. फडणवीसांनी काही तासांनी जाहीर केले की राष्ट्रवादी काँग्रेस जो नेता निवडेल त्याच्या पाठीशी भाजपा पक्ष म्हणून उभा राहील. “अजितदादा पवार कुटुंबाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणाने आहोत”, असेही सांगायला फडणवीस चुकले नाहीत. या साऱ्याचा जो मिततार्थ होता तो शरद पवारांच्या प्रेस कॉन्फरन्समुळे आणखी अधोरेखित झाला. शरद पवारांनी पुतण्याच्या मृत्युनंतर अशी पत्रकार परिषद मुद्दाम घ्यावी हे थोडे आश्चर्यकारक होते.त्यातून तायंना असाच मेसेज द्यायचा होता की सुनेत्रा यांना नेता निवडण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, पटेल व तटकरेंना नक्कीच आहे. पण मला त्याची कल्पना नाही. मला वा पवार कुटुंबातील इतरांना सुनेत्रा यांच्या शपथविधीचे निमंत्रण नाही. आमच्या दोन्ही पक्षांचे विलिनीकरण व्हावे ही दादांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या. पत्रकारांशी असा सुसंवाद साधल्यानंतरया शरद पवारांनी पंधरा दिवसां पूर्वी झालेल्या एका बैठकीचा व्हिडिओ जारी केला. “पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा जयंत पाटील करत होते. माझ्यापुढे त्या चर्चा नव्हत्या”, असा जो दावा पवारांनी केला, तो मात्र याच व्हिडिओतून उघडा पडला! 17 जानेवारी रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दादा बोलत आहेत, पवारही काही सांगत आहेत, जयंत पाटील राजेश टोपे, रोहीत पवार आदि रा.काँ.श.प. पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते ऐकत आहेत, असा तो व्हीडिओ आहे. त्यात राष्ट्रवादीचे पटेल, तटकरे वा अन्य कुणी दादा गटाचे नेते दिसत नाहीत. शरद पवारांनीच ती बैठक स्वतःच्या घरी बोलावली असावी व त्यात एकट्या दादांनीच हजर राहावे असेही सुचवले असावे. म्हणजे विलिनीकरणाची इच्छा व प्रयत्न श.प.रा.काँ. कडून अधिक नेटाने सुरु होते हेच स्पष्ट होते. या पक्ष विलिनीकरणाची घोषणा सुनेत्रा यांची नेता निवड होण्याच्या आधीच व्हावी अशीही शरद पवारांची इच्छा होती का ? तसे झाले असते तर दोन्ही पक्षांतील सर्वात वरिष्ठ तसेच पवार कुटुंबाचेही अध्वर्यू या नात्याने शरद पवारांच्याच हातात पुढच्या राजकारणाची सारी सूत्रे गेली असती. कदाचित हे ओळखून व तेच टाळण्यासाठी सुनेत्रा विधिमंडळ राष्ट्रवादी कँग्रेस पक्षाच्या नेतेपदी, पटेल, तटकरे, भुजबळांनी निवड करून टाकली. जयंत पाटील व शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना विलिनीकरण दादा हयात असते तर फेब्रुवारीच्या पहिल्याच सप्ताहात झाले असते असे सांगितले. पण हे सारे अजितदादांच्या बरोबर महायुतीत सहभागी होणार होते का ? विरोधकांच्या आघाडीतून शरदराव पूर्णपणाने बाहेर पडणार का? यावर मात्र या दोन्ही नेत्यांनी मौन बाळगले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या चालीमुळे सुप्रिया सुळेंना केंद्रात वा जयंत पाटील, राजेश टोपे, रोहीत पवार यांना राज्यात मंत्रीपदाची संधी मिळणे सध्या दुरापास्त होणार आहे !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *