केडीएमसी क्षेत्रात पसरलेल्या धुळीबाबत उपायोजना करण्याची सहयोग सामाजिक संस्थेची मागणी

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले असून या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. धुळीमुळे अनेक आजार उद्भवत असून पसरलेल्या या धुळीबाबत उपायोजना करण्याची मागणी सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी केडीएमसी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवली शहरात कुठेही जा संपूर्ण शहर हे धुळीने माखले आहे, एकही रस्ता असा नाही  जिथे धूळ नाही, रस्त्याजवळच्या गाड्या, इमारती, झाडे हे पण धुळीने भरले आहेत. लोकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, श्वसन संस्थेच्या, घशाच्या विकाराने अनेक लोक आजारी पडले आहेत. रस्त्याजवळ ऊभी असणारी गाडी एका दिवसात संपूर्ण धुळीने भरली जाते, तर त्याच रस्त्यावरून माणूस जाताना त्याच्या नाका तोंडावाटे किती धूळ त्याच्या शरीरात जात असेल याची कल्पना न केलेली बरी.  झाडांचा सुद्धा श्वास कोंडला आहे, जी झाडे हिरवीगार दिसायला पाहिजे, ती धुळीने भरलेली दिसतात.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त हे उच्च शिक्षित आहेत, तसेच ते धडाडीने काम करणारे अधिकारी आहेत. घन कचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना त्याच विभागासाठी राज्यस्तरीय व राष्टीय स्तरावर अनेक पारितोषिक प्राप्त झाले आहेत. राज्याचे नेतृत्व करणारे कल्याण डोंबिवली महापालिकेचे सुद्धा नेतृत्व करत आहेत, असे असताना सुद्धा हे शहर धुळीने व घाणीने का भरले आहे असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहरात जी धूळ पसरलेली त्याबाबत उपाययोजना करावी, व नागरिकांना त्या पासून होणाऱ्या आजारापासून वाचवावे अशी मागणी सहयोग सामाजिक संस्थेने केली आहे.

शहरातपसरलेलीधूळकमीकरण्यासाठीमलनिस्सारणप्रकल्पातूनप्रक्रियाकेलेलेचांगलेपाणीरस्ताधुण्यासाठीवापरूशकतो, तसेचशहरातमोठ्याप्रमाणातविकासकामेहोतअसल्यामुळेखडी, वाळू,सिमेंट, आरएमसीवाहूननेणारेट्रकहेआपल्यासोबतमोठ्याप्रमाणातधूळशहरातआणतात, त्यामुळेत्यांच्यागाड्यांचीवचाकाचीकडकतपासणीव्हावीअशासूचनादेखीलसहयोगसामाजिकसंस्थेच्यावतीनेकेडीएमसीआयुक्तांनाकरण्यातआल्याआहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *