खरेदी विक्री संघाच्या ताब्यात असलेली रास्तभाव धान्य दुकाने विधवा महिला व दिव्यांग व्यक्तींना देण्याची मागणी…

राजीव चंदने

मुरबाड :  मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाच्या अखत्यारीत मुरबाड शहर व तालुक्यात एकूण १६ रास्तभाव धान्य दुकाने आहेत. मात्र ही दुकाने गेली अनेक वर्ष नाममात्र भाडेपोटी श्रीमंत,धनदांडग्या व्यक्तींना चालविण्यासाठी दिली असून या दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात गरिबांच्या धान्याचा अपहार केल्याचे समोर आले आहे, तरीसुद्धा खरेदी विक्री संघाने अनेकवेळा या दुकानदारांना पाठीशी घातले आहे.

शासनाच्या धान्याचा अपहार करणारे व खरेदी विक्री संघांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या दुकानदारांकडून ही दुकाने काढून ती नव्या पद्धतीने शहर व तालुक्यातील गरजू विधवा महिला,दिव्यांग व्यक्ती, बेरोजगार तरूण-तरूणींना, बचत गटांना चालविण्यासाठी देण्यात यावे अशी लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दिलीप पवार यांनी खरेदी विक्री संघाचे प्रशासकीय चेअरमन यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *