ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचा ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सत्कार

आरती परब

दिवा: ठाणे महानगरपालिकेत नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर ठाणे जिल्हा सत्र न्यायालय येथे ठाणे जिल्हा वकील संघटनेतर्फे ऍड. आदेश भगत यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी बार काऊंसिल महाराष्ट्र अँड गोवाचे चेअरमन तथा ज्येष्ठ विधीतज्ञ गजानन बाबाजी चव्हाण, ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अप्पा कदम, तसेच ज्येष्ठ वकील गुरुवर्य पी. बी. भोसले यांनी ऍड. आदेश भगत यांचे अभिनंदन केले. त्यांनी त्यांच्या सामाजिक, कायदेशीर व सार्वजनिक कार्याची प्रशंसा करत आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभास ठाणे जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ वकील, पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. नगरसेवक म्हणून कार्य करताना सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आणि शहराच्या विकासासाठी योगदान देण्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *