भाजपाच्या पियुष गोयलांनी केले
प्रफुल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्ष !
मुंबई : अजित पवारांच्या निधनामुळे अवघा महाराष्ट्र दुखात असतनाच आज भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्याचे सांगितले आणि अवघ्या महाराष्ट्रता एकच गोंधळ उडाला. लगोलग प्रफुल पटेल यांनी व्टिट करून याचा इन्कार केला. पण यामुळे महाराष्ट्राचे राजकारण मात्र चांगलेच पेटले होते.
आपल्या व्टिटमध्ये पटेल यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात असून या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाह असे स्पष्टीकरण दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्त्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तसेच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही लगोलग या बातमीचा खुलासा केला आणि सांयकाळ होताहोता पियुष गोयल यांनी आपणास एका वरिष्ठ पत्रकाराने चुकीची माहिती दिल्यामुळे आपण हे चुकीचे वक्तव्य केल्याचे स्पष्ट केले.
