३५ वर्षांनी पुन्हा भरली मित्रांची शाळा

केईएस हंस भुग्रा मराठी माध्यम शाळेतील १९८१-१९९० या बॅचचे विद्यार्थी जमले एकत्र

कल्याण: मैत्री ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होते किंबहुना व्हायलाच हवी, शाळेतली मैत्री ती तर खुपचं खास असते मौल्यवान असते आणि ही परत मिळतं नसते आणि म्हणुनच ती कायम जपायची जोपासायची असते जशी मुंबईतल्या ह्या केईएस मराठी माध्यमातल्या माजी विद्यार्थ्यांनी गेली साडे तीन दशकं जपलीय.

३५ वर्षांनंतर मुंबईच्या सांताक्रुझ पुर्व ह्या उपनगरातील कालिना येथील केईएस हंस भुग्रा (मराठी माध्यम)शाळेतील १९८१-१९९० ह्या बॅचमधील तब्बल ३२ माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि एक सुंदर दोन दिवसीय स्नेहसोहळा नुकताचवाडा, पालघर येथे आयोजित केला होता. यामध्ये सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत. कुणी डॉक्टर झालयं तर कुणी चार्टर्ड अकाऊंटंट कुणी मोठ्या कॅार्पोरेट कंपनीत काम करतय तर कुणी उद्योजक आहे कुणी शिक्षिका तर कुणी गृहिणी कुणी कोकणात आहेत तर कुणी परदेशात. पण ह्या सगळ्या विखुरलेल्या माजी विद्यार्थ्यांना २०११ मध्ये सुरु झालेला “केईएस स्कुल १९८१-१९९० बॅच” या व्हॅाट्सॲप ग्रुपने.

या स्नेहसोहळ्याला डोंबिवली, पुणे, मालवण, गडचिरोली इथुन शाळेतले माजी विद्यार्थी आले होते. ह्या स्नेह सोहळ्यासाठी खास शाळेच्या बॅचच्या लोगोचं एक छान टिशर्ट बनवण्यात आले होते आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना एक सुंदर भेटवस्तु म्हणुन हे टिशर्ट, हातातील रिस्टबॅंड जो खास ह्या स्नेहसोहळ्यासाठी बनवलेला, अत्तर आणि हाताने लिहिलेलं ग्रीटिंग कार्ड आणि मिठाई देण्यात आलं सर्वचं विद्यार्थी एकमेकांना बघुन आनंदी आणि उत्साही होते. या स्नेहसोहळ्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा सामुहीक ५०वा वाढदिवस सुध्दा औक्षण करुन आणि केक कापुन साजरा केला. आकाशात फटाक्यांच्या आतषबाजीने सगळेच भारावुन गेले.

गाण्यांची शेरोशायरीची मैफिल जमली, शाळेतल्या जुन्या गप्पा रंगल्या, एकाच बाकावरचे मित्र जेव्हा भेटले तेव्हा आपसुकचं भावनांचा बांध तुटला आणि गळाभेट झाली, खुप जुन्या आठवणींना वाट मोकळी केली, बऱ्याचं विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत मांडलं. या स्नेहसोहळ्याच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थ्यांनी दोन दिवस एकमेकांच्या सहवासात धमाल मस्ती करत आनंदात घालवले.

प्रत्येक शाळेतल्या खास करुन “मराठी माध्यमातील” शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हे असे स्नेहसोहळे करत रहावे. याने आत्ताच्या नवीन पिढीला सुध्दा हे कळेल की मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेली हे सर्व माजी विद्यार्थी आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी आहेत. शाळा हा एकमेव असा दुवा आहे जो आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरीही आपल्या सगळ्यांना घट्ट बांधुन ठेवतो  आणि ३५ वर्षांनी पुन्हा असे स्नेहसोहळे घडवुन आणतो. केईएस शाळेतील १९८१-१९९० बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी तो सुंदर दुवा जिवापाड जपुन ठेवलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *