ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
नवी मुंबई : महानगरपालिका विभागामार्फत मा.आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ.राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ.कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालया अंतर्गत SS-II/B-२२९, से-०२, ऐरोली, नवी मुंबई येथे बबन बाबू पवार, गुफरान खान (ठेकेदार), ओमकार निर्गुडे (आर्किटेक्ट) यांनी तसेच SS-II/B-२३०, से-०२, ऐरोली, नवी मुंबई येथे प्रेमानंद प्रजापती, गुफरान खान (ठेकेदार), ओमकार निर्गुडे (आर्किटेक्ट) यांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते.
बबन बाबू पवार, गुफरान खान (ठेकेदार), ओमकार निर्गुडे (आर्किटेक्ट), SS-II/B-२२९, से-०२, ऐरोली, नवी मुंबई व प्रेमानंद प्रजापती, गुफरान खान (ठेकेदार), ओमकार निर्गुडे (आर्किटेक्ट), तसेच SS-II/B-२३०, से-०२, ऐरोली, नवी मुंबई यांच्या अनधिकृत बांधकामांस जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५4 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकाम नैनेश एस. बदले, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी ऐरोली, यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच अनधिकृत बांधकाम हटविण्याचे दंडात्मक शुल्क प्रती रु- ५,०००/- प्रमाणे एकूण रु- १०,०००/- वसूल करण्यात आले. सदर धडक मोहिमेसाठी जी-विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी, मजूर -१०, ब्रेकर-२, गॅसकटर-१, घण- २ तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. या पुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
