काँग्रेसचे सात, माकपचा एक खासदार निलंबित

राहुल गांधींना बोलू न दिल्याने खासदारांना घातला होता गोंधळ

अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले होते कागद

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याने संसदेत मोठा गोंधळ झाला. चीनच्या भारतातील अतिक्रमणावर राहुल गांधीना बोलू न दिल्याने काँग्रेसच्या काही खासदारांनी पीठासन सभापतींच्या दिशेने कागद भिरकावले. त्यामुळे पीठासन सभापतींनी काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदाराला अधिवेशनाच्या कार्यकाळापर्यंत निलंबित केलं.

निलंबित करण्यात आलेल्या खासदारात गुरदीप सिंह औजला मणिकम टागोर अमरिंदर सिंहराजा वारिंगकिरण कुमार रेड्डीहिबी ईडनडीन कुरियाकोसप्रशांत पडोले या काँग्रेसच्या खासदारांसह माकपच्या  एस वेंकटेशन यांचा समावेश आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पूर्व लष्कर प्रमुख एमएम नरवणे यांच्या न प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा दाखला दिला. त्यावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला. भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान गलवान खाडीमध्ये झालेल्या वादावर त्या पुस्तकात नरवणे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या या मुद्द्याला विरोध केला. त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज तहकुब करण्यात आलं.

दुसऱ्या दिवशीही हा वाद सुरूच राहिल्याचं दिसून आलं. लोकसभेची कार्यवाही सुरू झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक खासदारांनी गोंधळास सुरूवात केली. या दरम्यान, काँग्रेसच्या काही खासादरांनी पीठासन सभापतींच्या दिशेने कागद भिरकावले. त्यामुळे एकूण आठ खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय पीठासन सभापतींनी घेतला.

आठ खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी विरोध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *