केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यावेळी आयोजित  महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना झापले.
महापालिकेची पहिली महासभा ही आज पार पडली. ती खऱ्या अर्थाने गाजली, या महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लिक शेट्टी यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना झापले. या महासभेत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही,  बोलू नका, नाहीतर बाहेर पडा असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांना खूप माज आलाय असं ही ते म्हणाले.  महापौर निवडीनंतर भाषणा दरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि मल्लेश शेट्टी यांच्यामध्ये वाद पहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *