शहापूरात सिकलसेल तपासणी मोहीम
ठाणे: शहापूर तालुक्यातील शहापूर शहरात सिकलसेल तपासणी मोहीम सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रुण अंतर्गत असलेल्या उपकेंद्रा मार्फत शहापूर नंबर-१ येथील वारघडे नगर,व तावडे नगर गोणे नगर येथे अरुणोदय सिकल सेल अभियाना अंतर्गत सिकलसेल तपासणी शिबिर मोहीम आयोजित केले होती.
या शिबिरामध्ये दिपक दवणे आरोग्य सेवक व अनिता ढोन्नर,कविता जाधव,अश्विनी पडवळ या अशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.शहापूर शहरात घरोघरी व सोसायटी मध्ये जाऊन सिकलसेल तपासणी शिबिर यशस्वी करण्यात आले आहे हे अरुणोदय सिकल सेल अभियाना तपासणी मोहीम १० जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत केली जाणार आहे. या सिकलसेल तपासणी मोहीमेत आतापर्यंत एकूण ३०० जणांची तपासणी करण्यात आली आहे. शहापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोनपिंपले तसेच आरोग्य पर्यवेक्षक प्रदिप चंदे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिबीराची पाहणी केली हे सिकलसेल आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.
