एकताच्या शोर्मा स्टॉलला डोंबिवलीत मनसे साथ

डोंबिवली : डोंबिवली स्थानकाजवळ शोर्मा चिकन रोल विक्री करणाऱ्या मराठी तरुणी एकता सावंतचा स्टॉल महापालिकेच्या कारवाईत काही दिवसांपूर्वी हटवण्यात आला होता. यावर तिने सोशल मीडीयावर आवाज उठवल्यावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी तीला मनसे साथ देत तिचा स्टॉल पुन्हा उभा करून दिला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत जाऊन एकता सावंतची भेट घेतली. त्यांनी एकताची तक्रार ऐकून घेत व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. “तू स्टॉल लाव, अधिकाऱ्यांशी मी राज साहेब बोलून घेईन,” असा शब्द देत त्यांनी एकता सावंतला दिलासा दिला.

त्यानंतर आज अविनाश जाधव यांच्या हस्ते नव्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. “मराठी माणसाला व्यवसाय करू द्या,” असा भावनिक संदेशही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *