मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी आणि विडंबन गाणे तयार केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा आणि ते व्हायरल करणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांना समन्स बजावले आहे.
मार्च २०२५ मध्ये कुणाल कामरा याने एका स्टँड-अप शो दरम्यान ‘दिल तो पागल है’ या गाण्याच्या चालीवर एक विडंबन गाणे तयार केले होते. या गाण्यातून त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर ‘गद्दार’ अशी टीका केली होती. या कृत्याबद्दल भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. सुषमा अंधारे यांनी या गाण्याचे आणि कामराचे समर्थन केल्यामुळे त्यांनाही या प्रकरणात गोवण्यात आले आहे.
विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सांगितले की, कामरा आणि अंधारे यांना १५ दिवसांपूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. आता त्यांना उद्या, गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ते हजर राहिले नाहीत, तर समिती त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेऊ शकते.
