नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील मतदारयादी सुधारणा प्रकरणातर राज्याला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी वकीलीचा कोट चढवत स्वता सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. त्यांच्या या अचूक आणि आक्रमक युक्तीवादामुळे अवघा देश अवाक झालाय.

ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, 1979 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून एमए पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कोलकाता येथील जोगेश चंद्र चौधरी महाविद्यालयात एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. 1982 मध्ये त्यांनी एलएलबी पूर्ण केले.

सुप्रीम कोर्टात ममता यांनीयावेळी पश्चिम बंगालला निवडणूक आयोगाकडून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला. ज्या कामासाठी दोन वर्षे लागायला हवी होती ते काम तीन महिन्यांत पूर्ण केले जात असल्याचे ममता म्हणाल्या. सुनावणीनंतर, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, खरे उमेदवार मतदार यादीत राहिले पाहिजेत. ममतांच्या याचिकेवर खंडपीठाने निवडणूक आयोग आणि पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून ९ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान मुख्यमंत्र्याने न्यायालयात हजर राहून आपला युक्तिवाद केला. सहसा, मुख्यमंत्र्यांचे वकील किंवा सल्लागार न्यायालयात हजर राहतात.

न्याय दाराआड रडतोय

ममता बॅनर्जी म्हणाल्या,  मी बंगालची आहे आणि मी राज्याचे प्रतिनिधित्व करते. तुमच्या दयाळूपणामुळे मी इथं आहे. खंडपीठाला माझा आदरपूर्वक नमस्कार, वकिलांना माझा नम्र नमस्कार, समस्या अशी आहे की, सर्व काही संपलं आहे, आपल्याला न्याय मिळत नाही, दारामागे न्याय रडत आहे, असे दिसते की आपल्याला कुठेही न्याय मिळणार नाही. मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. मी खूप लहान व्यक्ती आहे, मी इथं माझ्या पक्षासाठी नाही तर न्यायासाठी  लढत आहे असा युक्तीवाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *