आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व अधिकारी समन्वेत महापौर, उपमहापौर यांची भेट घेत केले अभिनंदन

महापौर व उपमहापौर निवडणूकीनंतर आज महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व विभागप्रमुख व अधिकारी यांच्यासह महापौर श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौर श्री.दशरथ भगत यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सर्व अधिका-यांनी ओळख करुन दिली व आपल्याकडे असलेल्या विभागांची दिली. याप्रसंगी  विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने नागरिकांना अपेक्षित असलेले शहर विकासाचे काम करुया असे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रतिपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *