हरारे : विरारचा छोरा आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडला १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करून सहाव्यांदा वर्ल्डचॅम्प बनण्याचा मान मिळविला. योगायोग म्हणजे भारताच्या या सहावर्ल्डकप विजेतेपदात टिमचा कॅप्टन दुसऱ्यांदा विरारचा छोरा ठरला आहे. आयुष म्हात्रेच्या आधी विरारमध्ये जन्मलेल्या पृथ्वी शॉने २०१८ साली आपल्या कॅप्टन्सीच्या जोरावर भारताला १९ वर्षाखाली वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवून दिले होते.

फायनलमध्ये भारतानं इंग्लंडला १०० धावांनी पराभव केला. या मॅचमध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं १७५ धावांची तुफानी खेळी केली.

 भारतानं पहिल्यांदा मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वात अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद मिळवलं आहे.

२००० सालच्या त्या वर्ल्डकपमध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वात भारतानं श्रीलंकेला ६ विकेटनं पराभूत केलं होतं.

भारतानं दुसऱ्यांदा वर्ल्ड कपचं विजेतेपद विराट कोहलीच्या नेतृत्त्वात मिळवलं होतं. २००८ मध्ये भारतानं फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानुसार १२ धावांनी पराभूत केलं होतं.

२०१२ मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाला ६ विकेटनं पराभूत केलं होतं. उनमुक्त चंदनं फायनलमध्ये १११ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. अन्मुक्त चंद सध्या अमेरिकन क्रिकेट टीमसाठी खेळतोय.

त्यानंतर ६ वर्षांनी २०१८ मध्ये भारतानं विरारच्या पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वात विजेतेपद मिळवलं होतं. त्या टीममध्ये शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांचा समावेश होता.
२०२२ मध्ये भारतानं यश धुलच्या नेतृत्त्वात पाचव्यांदा विजेतेपद मिळवलं होतं.  आणि आता चार वर्षानंतर २०२६ मध्ये भारतानं आयुष म्हात्रेनं विजेतेपद मिळवलं आहे. भारतानं इंग्लंडला १०० धावांनी पराभूत केलं.

चौकट

१९ वर्षाखालील विश्वविजेत्या

भारतीय टीमचे कॅप्टन

मोहम्मद कैफ – वर्ल्ड कप २०००
विराट कोहली – वर्ल्ड कप २००८

उन्मुक्त चंद – वर्ल्ड कप २०१२
पृथ्वी शॉ – वर्ल्ड कप २०१८
यश धुल – वर्ल्ड कप २०२२
आयुष म्हात्रे – वर्ल्ड कप २०२६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *