राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली

मुंबई : मुंबई महिला विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नुकतीच प्रदेश कार्यालयात आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अजित दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. दादा आमच्या मध्ये नाही असे आम्हाला जराही वाटत नाही. कारण की त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक सारीक लक्ष असायचे. दादांकडे कोणतेही काम घेऊन जा आम्हाला विसरायला व्हायचं पण दादा कधीच ते विसरायचं नाही आणि ते काम मार्गी लागलेला असायचा अशी एक आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महिला अध्यक्ष आरतीताई साळवी यांनी सांगितलं.

या श्रद्धांजली महाराष्ट्र,मुंबई,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,वॉर्ड अध्यक्षा,व मुंबई कमिटी, जिल्हा कमिटी,तालुका कमिटी ,वार्डाची कमिटी ,पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *