एआयचा
मोठा दणका
चार दिवसांपूर्वी जगातील आयटी आणि एआय उद्योगांना प्रचंड मोठा हादरा बसला. जगभरातील या क्षेत्रातील सर्वच बडया दादा कंपन्यांनी मिळून, त्यांच्या शेअर बाजारातील मूल्यामधून, २५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य एकाच दणक्यात गमावले. इन्फोसिस व टीसीएस सारख्या मोठ्या भारतीय आयटी कंपन्यांनीही जवळपास दोन लाख कोटी रुपयांचा फटका शेअरबाजारातील घसरणीमुळे त्या दिवशी झेलला. याचे कारण अँथ्रोपिक या एआय क्षेत्रात पायाभूत काम करणाऱ्या कंपनीने एआय मधील सर्वात पुढची आवृत्ती ठरणारे, “क्लोड,” हे नवे टूल बाजारात आणले. त्याने तंत्र जग हादरले. पडझड झाली. अँथ्रोपिक हा शब्दच मुळी मानववंशशास्त्रा जवळ जाणारा आहे. (अँथ्रोपॉलॉजी). तंत्रक्षेत्राला हादरवणाऱ्या त्यांच्या कामाचा अंदाज असणाऱ्या इलॉन मस्क यंनी काही दिवसांपूर्वी ट्वीट केले की, “या कंपनीला मानवांच्या कामाची घृणा दिसते, यांनी अँथ्रोपिक म्हणण्या ऐवजी मिसअँथ्रोपिक असे नाव ठेवायला हवे होते.…!” अँथ्रोपिकने आणलेल्या नव्या एआय सूटमुळे हजारो कामगार कर्मचाऱ्यांची दैना उडण्याची शक्यता पाहता मस्क यांची व्याख्या पटूही शकते. डॅनियेला अमोडिली या तरूण तुर्क तंत्रज्ञ बाईंनी या कंपनीची अवघ्या सहा वर्षांपूर्वी स्थापना केली. त्या आधी ताय ओपन एआयमध्ये कार्यरत होत्या. जेमतेम तिशी चाळीसीतील या लोकांच्या अँथ्रोपिकने मोठ मोठ्या टेक कंपन्यांना जे जमले नाही ते करून दाखवले आहे. एआय किंवा मशीन लर्निंग याची सुरुवात अनेक संगणकाच्या जोडणीतून सुरु होणाऱ्या नेटवर्कमधून झालेली आहे. जसजशी संगणक तंत्रज्ञात प्रगती होत गेली तसतशी अधिकाधिक वेगाने प्रश्न सोडवण्यासाटी मोठ्या क्षमतेचया संगणकांची गरज भासू लागली. शेकडो सर्वर एकत्र असणाऱ्या क्लाऊड टेकनॉलॉजीमधून एआय व मशीन लर्निंग या आणखी आधुनिक क्षेत्रांचा उगम झाला. अमेरिकतील कंपन्यांना संगणकीय सेवा व सोल्युशन देणाऱ्या कंपन्या जगभरात सुरु झाल्या आणि त्यातूनच क्लाऊड कंप्युटिंगचे विविध पैलू आणि त्यातून आर्टिफिशयल इंटेलीजन्सचे नवे आयाम दिसू लागले. गेल्या दोन दशकांत एआय शब्द अधिक वेगाने कानी पडू लागला आणि अलिकडच्या काह वर्षात तो रोजच्या जीवनातही दिसू जाणवू लागला. तुमच्या हाके सरशी गाणी ऐकवणारी, फोन जोडून देणारी सेरी वा अलेक्सा ही त्याची लहान रूपे आहेत. विविध देशात बसून कामे करणाऱ्या दहा तंत्रज्ञांचे काम एकत्र करून अमेरिकेतील एखाद्या कंपनीच्या अकाऊंटिंगचे सारे प्रश्न सोडवणारी साधने हे एआयचे अधिक व्यापक रूप आहे. एआयच्याच वापरातून खेड्या पाड्यातील नागरिकांना शहरातील अत्याधुनिक डॉक्टरचा सल्ला मिळवून देता येऊ शकतो. अथवा शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची एकाच वेळी पडताळणी करून त्यातून चुकार मोटारगाडीचा शोध वा गुह्याची उकल हे एआय करून देते. एआयने आता रोजच्या जीवनातील विविध क्षेत्रे पादाक्रांत करायला सुरवात केलेली आहे. सिनेमाची स्क्रीप्ट लिहिणे, दोन चार ओळींच्या माहितीच्या आधारे पूर्ण वृत्तकथा तयार करणे, देशोदेसीच्या इंग्रजी मासिके वृत्तपत्रांमधून तुमच्या आवडीच्या विषयाची कात्रणे क्षणार्धात हजर करणे अशी कामे लीलया करण्यामध्ये एआयचा भरपूर वापर सध्या होतो आहे. व्हिडिओ तयार करणे इतकेच नव्हे तर पूर्ण तीन तासांचा सिनेमा जुळवून देणे, हेही काम एआय करू शकते. आता अँथ्रेपिकने जो “क्लोड” नावाचा एआय एजंट बाजारात आणला आहे त्यामुळे मोठ्या माहितीतून सुटसुटीत कामे करून देणाऱ्या बड्या टेक कंपन्यांचा पायाच हादरला आहे. कारण या कंपन्या जी कामे करण्यासाठी लाखो डॉलर्सची कंत्राटे घेत असतात, तीच सारी कामे क्लोड आता मूळ कंपनीसाठी अत्यंत कमी किंमतीत करून देणार आहे. अँथ्रोपिकचा प्रमुख तांत्रिक अधिकारी (सीटीओ) भारतीय तरूण आहे. बंगलूरु मध्ये कंप्यूटर सायन्सचे पदवीधर असणारे व सध्या अमेरिकेतील सिएटलमध्ये वास्तव्य करणारे राहुल पाटील! पाटील यांनी बेंगलुरुत इंजिनिअरींगची पदवी घेतली. अमेरिकेत कंप्युटर सास्नसमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. नऊ वर्षे मायक्रोसॉफ्टमध्ये होते. त्या दरम्यान त्यांनी एमबीए देखील अमेरिकेत वॉशिंग्टन विद्यापीठातून पूर्ण केले. अमेझॉन मध्येही ते होते. तिथे वेब सर्वीसेस विभागात त्यांनी महत्वाचे काम केले. प्रचंड क्षमतेचे डेटा प्रोसिसंग प्लॅटफॉर्म उभे करण्यात ते आघाडीवर राहिले. त्याचा लाभ मोबाईल अप्लीकेशन डेव्हलपरना तसेच इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आय़ओटी) काम करणाऱ्या तंत्रज्ञांना झाला. आयओटी हा एआयचाच मावसभाऊ म्हणावा लागेल. सेन्सर, सॉफ्टवेअरच्या माध्यमांतून इलेक्ट्रीकल वस्तु इंटरनेटच्या माध्मयांतून जोडल्या जाताता, एकमेकांमध्ये संवाद साधतात, ते तंत्रज्ञान म्हणजेच आयओटी. नंतर पाटील यांनी ओरॅकलमध्ये क्लाऊड इन्प्रास्ट्रक्चर विभागात उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर ते स्ट्राईप या कंपनीत सीटीओ म्हणून गेले. फायनान्शिअल सेवा दणारी ह कंपनी आहे. तिथे विविध मोठ्या कॉर्पोरेशन कंपन्यांच्या पगारांचे व्यवस्थापन करण्याचे सॉफ्टवेअर हाताळते जाते. त्यांच्याच कार्यकाळात स्ट्राईप कंपनीने एक ट्रिलियन इतक्या प्रचंड प्रमाणातील पगारपत्रकांची हाताळणी करण्याचा विक्रम नोंदवला होता. अशा प्रकारे सर्वच मोठ्या टेक जायंट कंपन्यांचा अनुभव घेऊन नंतर ते गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अँथ्रोपिक मध्ये दाखल झाले आणि आज तायंचे नाव टंक कंपन्यांत भीतीने आदराने घेतले जाते आहे. सहाच महिन्यात त्यांच्या कामाने जगाला हदारवले. टेक कंपन्यांच्या भविष्यावरही एआयची टांगती तलवार त्यातून उभी ठाकली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर एज अ सर्वीस म्हणजे आयएएएस, प्लॅटफॉर्म एज अ सर्वीस (पास) आणि सॉफ्टवेअर एज अ सर्वीस (सास) असा तीन्ही प्रकारांवर विविध टेक कंपन्या अवलंबून असतात. कमी खर्चात मोठ्या पायभूत संगणकीय सेवेचा वापर त्यातून होतो. पासमध्ये व सास मध्ये दुसऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सॉफ्टवेअर व प्लॅटफॉर्मचा वापर करून तिसऱ्या कंपनीची विविध कामे केली जातात. यातील सासमध्ये अँथ्रोपिकने आता उत्पात घडवला आहे. कारण आजवर कायदेशीर सल्ला व कागदपत्रांची पडताळणी, मोठ्या कंपन्यांची अकाऊंटिग सारखी किचकट व सतत एकाच प्रकारचे ( रिपिटेटीव्ह) कामे करणे यासाठी काही विशिष्ठ सॉप्टवेअर संबंधिक टेक कंपन्या वापरत असत. आता क्लोड या एआयच्या सहाय्याने टेक कंपन्यांची मध्यस्थीची गरजच भासणार नाही. क्लोड स्वतःच 11 क्षेत्रामधील कंपन्यांसाठी टेक मध्यस्थांची सारी कामे पार पाडू शकणार आहे. त्यामुळे एप्लीकेसन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) च्या सहाय्याने मोठी संगणकीय कामे करण्यासाठी विविध सल्लागार कंपन्या नेमण्याचीही गरज उरणार नाही. एंटरप्रयाजेस सॉफ्टवेअर, लीगल टेक्नोलॉजि, आयटी सर्वीसेस कंपन्यांचे अस्तित्वच कदाचित धोक्यात येऊ शकेल असे मानले जाते आहे. अँथ्रोपिकने काय केले की बड्या सॉफ्टवेअर कंपन्यांना स्वतःचे मॉडेल बांधण्यासाठी एपीआय पुरवण्या ऐवजी थेट स्वतःच ती कामे उरकून टाकणारे 11 सूट्स बाजारात आणले. थोडक्यात क्लोडने आता मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांना त्यांची कामे करण्यासाठी मदतनीस पुरवणे थांबवले आणि ती सारी कामे स्वतःच करून देणारा एआय कामगार पुरवला. सध्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या माध्यमांतून विविध कॉर्पोरेट हजारो डॉलर्स पगारावर आयटी इंजिनिअर नेमत असतात. अथवा त्या कंपन्यांना दशलक्ष डॉलर्सची कंत्राटे देऊन सल्लागार नेमत असतात. त्या गरज एक क्लोडचा सूट विकत घेण्याने भागू शकतात. तितक्याच हार्डवेअरमधून अधिक एआय कामगिरी वसूल करण्याचे तंत्रही पाटील यांच्या माध्यमांतून अँथ्रोपिकने वापरले आहे. हेही विशेष आहे. प्रत्यक्षात सॉफ्टवेअर कंपन्यांना कामे देणाऱ्या मूळ कंपन्यांनाच आता अँथ्रोपिकने क्लोड हा एआय एजंड ऑफर केल्यामुळे त्या कंपन्यांचे प्रचंड पैसे वाचणार आहेत. सहाजिकच सॉफ्चवेरमधील दादा कंपन्यांचे शेअर कोसळू लागले आहेत. यालाच वॉलस्ट्रीटने, “पाटील इफेक्ट” असे नामाभिधान बहाल केले आहे. स्वस्त इंटरफेसमुळे सॉफ्टवेअर कंपन्यांच्या ऐवजी स्वस्तातील पर्याय अँथ्रोपिकने उपलब्ध करून दिला आहे. अँथ्रोपिकने आता बेंगलुरुत त्यांचे दुसरे जागतिक ऑफीस उघडण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेबाहेर त्यांचे एक ऑफीस टोकियोत आहे. बेंगलुरुतील प्रवेशामुळे भारतातील हजारो होतकरू तरुणांना नोकरीची संधी ते देणार आहेत. पण त्यांच्या क्लोड एआयमुळे अन्य सॉफ्टवेअर कंपन्यांतील काही हजार तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात येतील का हा एक चिंतेचाच विषय असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *