एप्सटीन फाइल्स प्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी

कल्याण : कल्याण मध्ये एप्सटीन फाइल्सच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून, कल्याण पश्चिममध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या हातात एप्सटीन–मोदी, भाई–भाई असे आक्षेपार्ह पोस्टर्स झळकत होते. याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलन उग्र होत असल्याची शक्यता लक्षात घेता बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान मराठी चित्रपट झपाटलेला मधील प्रसिद्ध पात्र तात्या बिंचू यांच्या वेशभूषेत एक आंदोलक दिसून आला, जो उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *