कामात निष्काळजीपणा दाखवल्यास ठेकेदारावर कठोर कारवाईचा इशारा

कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या बांधकामाची केली पाहणी

उल्हासनगर : रविवारी आमदार कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी कामाचा दर्जा, त्याची प्रगती आणि अंतिम मुदत याबद्दल विचारपूस केली. रस्त्याचे काम प्रस्थापित मानकांनुसार, दर्जेदार पद्धतीने करावे, जेणेकरून नागरिकांना भविष्यात कोणत्याही अडचणींना तोंड द्यावे लागू नये, असे स्पष्ट निर्देश आमदार आयलानी यांनी संबंधित ठेकेदाराला दिले.

या पाहणीदरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी ठेकेदाराला कामात निष्काळजीपणा दाखवल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला. रस्ते बांधणीत कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या बांधकामच्या तपासणी दरम्यान प्रकाश लालवाणी यांच्यासह संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *