केरळमध्ये पदवीपर्यंत मोफत शिक्षण
अनिल ठाणेकर
केरळ : केरळ राज्यातील डाव्या आघाडीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने खऱ्या अर्थाने क्रांती घडवली आहे! २०२६ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री के. एन. बालागोपाल यांनी मोठी घोषणा केली की आता आर्ट्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी सरकारी व सहाय्यित महाविद्यालयांमध्ये पदवी (ग्रॅज्युएशन) पर्यंत पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
यापूर्वी इयत्ता १२ पर्यंत मोफत होते, आता ते अंडरग्रॅज्युएट स्तरापर्यंत विस्तारले. याचा थेट फायदा सुमारे ३.५ लाख विद्यार्थ्यांना होईल. ट्युशन फीची चिंता नको, गरीब, मागासवर्गीय कुटुंबांसाठी हा खरा वरदान. शिवाय पीएचडी विद्यार्थ्यांना महिन्याला १५,००० रुपये शिष्यवृत्तीही जाहीर – एकूण ३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केरळ हे भारतातील पहिले राज्य जे पदवी शिक्षण पूर्ण मोफत करते. यामुळे उच्च शिक्षण सर्वांसाठी सुलभ होईल, विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि देशाच्या भविष्य घडणाऱ्या पिढीला बळ मिळेल. महाराष्ट्रातही अशी योजना येईल का? की आम्हाला अजून वाट पाहावी लागेल, असे शिक्षणप्रेमी बोलत आहेत.
