गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप
शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेने सुरु केले विधायक कार्य
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या परंतु अद्यापही महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात आलेली नाही. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सारिका शशीकांत झोरे यांनी गरजू महिलांना मदतकार्य करण्याचे विधायक कार्य सुरु केले आहे. मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र.१२ बोरिवली आर मध्य विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, मसाला कांडप मशीनचे वाटप माजी महापौर, शिवसेनेच्या महानगरपालिका गटनेत्या सौ किशोरी पेडणेकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभा प्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभा निरीक्षक सिनेट सदस्य शशिकांत झोरे, नगरसेवक धरम काळे, माजी नगरसेवक सुजाता पाटेकर, चेतन कदम, सुनिल चव्हाण, सिनेट सदस्य मिलिंद साटम, सचिन मोरे, इतिश्री महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
