संरक्षण भिंतीमुळे पंचवटी नगरच्या रहिवाशांना दिलासा
नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रयत्नांना यश!
मुकुंद रांजाणे
माथेरान : माथेरानचा परिसर हा चोहोबाजूंनी डोंगर दर्यांनी हा संपूर्ण भूभाग व्यापलेला आहे. जागेअभावी अनेकांनी पूर्वीपासून जवळपास(चार दशकांपासून) कड्यालगत कुटुंबाच्या निवाऱ्यासाठी घरे बांधलेली आहेत.झोपडपट्टी म्हणून हा भाग आजही ओळखला जात आहे.पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कड्यालगत असणाऱ्या घरांच्या बाजूच्या मातीची पूर्णपणे धूप होऊन वाहून गेली आहे त्यामुळे तेथील रहिवाशांना अतिवृष्टी काळात जीव मुठीत धरून रात्रभर जागे राहून आपले जीवन कंठावे लागत होते. पंचवटी नगर येथील रहिवासी राकेश कोकळे यांनी याबाबत मागील पंधरा वर्षांपासून अनेकदा प्रशासनाला निवेदने देऊनही काहीएक साध्य झाले नव्हते.अखेरीस ही बाब विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी आपल्या परीने अधिकारी वर्गाशी चर्चा करून याभागात संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.या महत्वपूर्ण कामामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मागील अनेक वर्षा पासून पंचवटी नगर भागात जमिनीची धूप होत होती. अनेक वर्षे त्या ठिकाणचे रहिवासी असणारे राकेश कोकळे पाठपुरावा करीत असताना मी पाहत होतो. प्रत्येक वेळी या कामासाठी राजकीय अडथळे येत असताना या भागातील गोर गरीब व्यक्तीची घरे वाचली पाहिजे या सामाजिक भावनेने मी ठेकेदार आणि पालिका अधिकारी यांना सूचना केली होती.त्यानुसार याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
शिवाजी शिंदे—गटनेते माथेरान नगरपरिषद
आमच्या पंचवटी नगर येथील माझ्या घराच्या मागील बाजूस दरवर्षीच्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी वाहून जात होते. त्यामुळे तेथील मातीची प्रचंड प्रमाणात धूप होऊन हा भाग पूर्णपणे धोकादायक बनला होता. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना जीव मुठीत धरून पावसाळ्यात जीवन जगावे लागत होते. मी अनेकवेळा याबाबत प्रशासनाला लेखी निवेदने दिली होती की या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अनेकवेळा विविध वर्तमानपत्रात बातम्या सुध्दा दिल्या होत्या. अखेरीस नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी पाठपुरावा करून याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आम्हा रहिवाशांना दिलासा मिळाला आहे याबद्दल मुख्याधिकारी राहुल इंगळे,  नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, नगरसेवक तथा गटनेते शिवाजी शिंदे,तसेच पत्रकार मुकुंद रांजाणे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे.
राकेश कोकळे–पंचवटी नगर रहिवासी,माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *