अंजना उबाळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न
ठाणे : शहापूर तालुक्यातील साठगाव येथील रहिवासी असलेल्या अंजना तानाजी उबाळे या भिवंडी परिमंडळ पोलीस उपायुक्त कार्यालयात सळग ३१ वर्षे चतुर्थ श्रेणी पदावरून आपली सेवा करून अलीकडेच सेवानिवृत्त झाल्या आहेत.काल त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साठगाव येथे आयोजित करण्यात आला होता.त्यांनी  उत्तम सेवा बजावली.त्याच्या सेवेच्या कामगिरी बद्दल ठाणे पोलिस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांनी त्यांच्या कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मधुकर उबाळे,जेष्ठ पत्रकार  बी.डी. गायकवाड,पत्रकार अविनाश उबाळे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मारुती चन्ने,डॉ.  बी.बी. प्रधान,कुमार उबाळे,गोविंद विशे,लक्ष्मण विशे,दीपक गायकवाड,मनोहर गायकवाड,जगन गायकवाड,राज जाधव भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी,साठगावचे पोलीस पाटील सचिन गायकवाड गावातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी भीमाई संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.उपस्थित मान्यवरांनी सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे  बौद्धाचार्य  मनोज गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार घनश्याम गायकवाड यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *