केंद्र सरकारच्या मालकधार्जिणे व कामगारविरोधी धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप – हरभजन सिंग सिद्धू
अनिल ठाणेकर
ठाणे : केंद्र सरकारच्या या मालक धार्जिणे व कामगार धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात आपण सहभागी व्हा. मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा द्या. सर्व कामगारांनी एक दिवसाचा खाडा करून आपल्या न्याय हक्कासाठी देशव्यापी संप यशस्वी करावा, असे आवाहन हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू यांनी जाहीर सभेत केले महाराष्ट्र हिंदू सभेच्या वतीने नुकतीच म्युनिसिपल मजदूर युनियन, बाळ दंडवते सभागृह, करी रोड, मुंबई येथे “कामगार विरोधी चार लेबर कोड “ या विषयावर कामगार कर्मचाऱ्यांची परिषद संपन्न झाली.
केंद्र सरकारने मालकांच्या दबावाला बळी पडून कोणत्याही केंद्रीय कामगार संघटनाना विश्वासात न घेता चार कामगार विरोधी श्रम सहिता अमलात आणल्या आहेत.केंद्र सरकारचे ४४ कामगार कायदे असून राज्य सरकारचे काही कायदे मिळून स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर जवळजवळ शंभर कामगार कायदे अस्तित्वात होते. परंतु केंद्र सरकारने मालकांना खुश करण्यासाठी २९ कामगार कायद्याचे चार लेबर कोडमध्ये रूपांतर करून भारतातील कामगारांच्या हक्कावर फार मोठा हल्ला केला आहे. यामुळे कामगारांचा संपाचा अधिकार गेला असून,१ एप्रिल पासून कामगार संघटना बनवणे देखील कठीण होणार आहे. केंद्र सरकारच्या या मालक धार्जिणे व कामगार धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात आपण सहभागी व्हा. मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा द्या . सर्व कामगारांनी एक दिवसाचा खाडा करून आपल्या न्याय हक्कासाठी देशव्यापी संप यशस्वी करावा,असे आवाहन हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू यांनी जाहीर सभेत केले
महाराष्ट्र हिंद मजदूर सभेची नुकतीच म्युनिसिपल मजदूर युनियन, बाळ दंडवते सभागृह, करी रोड, मुंबई येथे “कामगार विरोधी चार लेबर कोड” या विषयावर कामगार कर्मचाऱ्यांची परिषद संपन्न झाली.
महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष निवृत्ती धुमाळ यांनी स्वागतपर भाषण केले, तर जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी प्रास्ताविक भाषण केले. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. कामगार परिषदेमध्ये हिंद मजदूर सभेचे खजिनदार जे. आर. भोसले, उपाध्यक्ष कॉ. वेणू नायर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. याप्रसंगी एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, हिंद मजदूर सभेचे उपाध्यक्ष वामन कविस्कर, हिंद मजदूर सभेच्या महिला नेत्या संज्योत वढावकर, रंजना आठवले, शीला भगत, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, भविष्य निर्वाह निधी कर्मचारी संघटनेचे ठाकरे, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे प्रदीप शिंदे, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज एम्प्लॉईज युनियनचे विकास गुप्ते, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे व्यंकटेश स्वामी, बबन मेटे, मुंबई टांकसाळ मजदूर सभेचे मुकुंद वाजे, नुसीचे सलीम झगडे, श्रीमती सोनवणे, जनरल मजदूर सभेचे उपाध्याय आदी मान्यवर कामगार नेते, कार्यकर्ते, कामगार मोठ्या संख्येने कामगार परिषदेला उपस्थित होते.हरभजन सिंग सिद्धू आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले की, आपल्या देशात १४० कोटी लोकसंख्येपैकी ६४ कोटी कामगार आहेत. राष्ट्रीय आर्थिक अहवालानुसार आपल्या देशामध्ये ७० लाख नोकऱ्या खाली आहेत. सरकारने रिकाम्या जागा अद्याप भरल्या नाहीत. सार्वजनिक उद्योग धंदे त्याचप्रमाणे पोर्ट, रेल्वे, कोळसा या ठिकाणी कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना न्याय हक्कापासून पासून वंचित केले जाते. कंत्राटी कामगारांना मालकांनी पगार दिल्यानंतर, काही मालक त्यातली काही रक्कम परत घेतात. हा कंत्राटी कामगारावर फार मोठा अन्याय आहे, असे मत हरभजन सिंग सिद्धू यांनी न्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *