केडीएमसीच्या “डिप क्लीनिंग” विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
महापौर हर्षाली चौधरी थविल, उपमहापौर राहुल दामले यांच्याहस्ते मोहिमेला सुरवात
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महापौर हर्षाली चौधरी थविल व उपमहापौर राहूल दामले यांच्या हस्ते दुर्गाडी किल्ला येथून दुर्गा देवीचे दर्शन घेऊन “डिप क्लीनिंग” विशेष स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. ही मोहीम सर्व प्रभागक्षेत्रात सुरुवात करण्यात आलेली आहे.
९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत हि विशेष स्वच्छता मोहीम दैनंदिन सर्व प्रभागक्षेत्रात सुरु राहणार आहे. या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन उप आयुक्त रामदास कोकरे यांनी प्रस्तावना करुन स्वच्छता मोहीम राबविणे का आवश्यक आहे व त्याचे महत्व काय? याबाबत नागरीकांचा सहभाग अपेक्षित आहे असे सांगितले. तर आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्वकष स्वच्छता ठेवुन शहर शाश्वत स्वच्छ कसे राहिल या करिता व मानांकन उंचावणेकरीता नगरसेवक व नागरिक यांनी सहकार्य करण्याचे आश्वासीत केले. उप महापौर राहूल दामले यांनी सुध्दा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करावेत. महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांनी संपूर्ण शहर तसेच ग्रामिण विभाग सुध्दा सर्वकष विशेष स्वच्छता मोहीम राबवून शहराचे मानांकन उंचावण्याचे आदेश उप आयुक्त व सर्व अधिका-यांना दिले.
अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी महापौर, उप महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, नगरसेवक अस्मिता मोरे, विजया पोटे, शालिनी वायले, रेखा चौधरी, समिना शेख, गणेश जाधव, गणेश लांडगे, उमेश बोरगांवकर, मोरेश्वर भोईर, जयवंत भोईर, रमेश जाधव, कांचन कुलकर्णी, जतिन प्रजापती, तसेच सहा. आयुक्त प्रीती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी आगस्तिन घुटे, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
