१२ पैकी सात जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता

 पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

रत्नागिरीत एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्ता

सांगलीत महाविकास आघाडी सत्तेत

मुंबई : बुहप्रतिक्षित १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निकालात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा नंबर एकचा पक्ष बनला आहे. भाजपाची १२पैकी ७ जिल्हा परिषदेत सत्ता असेल. तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी, रत्नागिरीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि सांगलित महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता असेल. उर्वरीत ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे.

एकुण ७,४३८ उमेदवारांच्या रिंगणातून ७३१ जिल्हा परिषद व १,४६२ पंचायत समिती जागांसाठी झालेल्या या निवडणुकांनी ग्रामीण मतदारांचा स्पष्ट कौल दिला आहे. पुण्यात राष्ट्रवादीने ७३ पैकी ४७ जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली, तर रत्नागिरीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने  ६८ पैकी ४० जागा पटकावत स्पष्ट बहुमत मिळवले.

भाजपाने स्वताचाच विक्रम मोडला

मुंबई : भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेतील आपला २०१७ चा रेकॉर्ड मोडला आहे, २०१७ साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला १४१ जागा होत्या, पण आत्तपर्यंत घोषित झालेल्या निकालांमध्येच २३६ जागा भाजपाला मिळाल्या आहेत, असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवला आहे त्याबद्दल आम्ही तमाम महाराष्ट्राचे आभारी आहोत अशी प्रतिक्रीया फडणवीस यांनी म्हटले.

पंचायत समिती निवडणूक निकालाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, २०१७ साली भाजपाला एकूण २८४ जागा होत्या पण आत्तापर्यंतच्या जाहीर झालेल्या कलांमध्ये ४१० जागा भाजपाला मिळालेल्या आहेत. साधारणपणे १२५ पंचायत समितींचा कल बघितला तर यापैकी ५० पंचायत समिती या भाजपाकडे, २६ शिवसेनेकडे असतील, २३ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील, बाकी ७-८ काँग्रेसकडे, ७ ते ८ शरद पवारांच्या पक्षाकडे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे ५ जागा असतील. त्यामुळे इथे देखील महायुतीला १२५ पैकी १०० च्या वर पंचायत समिती जिंकता आल्या आहेत.

1.रायगडजिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा 59

भाजप- 15
शिवसेना- 21
राष्ट्रवादी काँग्रेस- – 16
शिवसेना ठाकरे गट – 05
काँग्रेस -2
शेकाप-0

2. रत्नागिरीजिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा : 56

भाजप- 04

शिंदे शिवसेना – 40

राष्ट्रवादी अजित पवार गट- 5

शिवसेना ठाकरे गट – 6

मनसे -1

काँग्रेस –

राष्ट्रवादी शरद पवार गट -0

अपक्ष  – 0

3. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा- 50

भाजप :   27
शिवसेना :   14
शिवसेना UBT:   03
राष्ट्रवादी :  00
काँग्रेस :   00
अपक्ष :06

4.पुणेजिल्हा परिषदेचा निकाल-

एकुण जागा – 73

भाजप — 10
शिवसेना — 4
राष्ट्रवादी — 48
शरद पवार गट — 1
ठाकरे गट — 6
काँग्रेस — 0
अपक्ष — 0

5. साताराजिल्हा परिषदेचा निकाल-

एकुण जागा : 65
भाजप – 23
शिवसेना – 13
राष्ट्रवादी – 22
ठाकरे गट- 0
काँग्रेस : 1
इतर- 2

6. सांगली जिल्हा परिषदेचा निकाल-

सांगली जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (एकूण 61 जागा)

भाजप – 16

राष्ट्रवादी अजित पवार – 6

काँग्रेस – 11

शिवसेना शिंदे गट – 07

राष्ट्रवादी शरद पवार गट – 18

शिवसेना ठाकरे गट – 01

जनसुराज्य – 01

रयत क्रांती (सदाभाऊ खोत)  – 01

7. कोल्हापूरजिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा – 68

भाजप – 12
शिवसेना (शिंदे) – 9
राष्ट्रवादी – 20
काँग्रेस –   15
शिवसेना (ठाकरे) – 1
जनसुराज्य – 6
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4

8. सोलापूरजिल्हा परिषदेचा निकाल-

एकुण जागा : 68

भाजप – 36
शिवसेना – 5
राष्ट्रवादी – 10

राष्ट्रवादी शरद पवार – 7
शेकाप – 3
इतर- 2

9. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा 63

भाजप :   23 आणि पुरस्कृत 2
शिवसेना :   21 आणि पुरस्कृत 1

शिवसेना UBT:   9
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 4
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 1
काँग्रेस : 1
अपक्ष : 1

10. परभणी जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा- 54
भाजप :  24
शिवसेना : 05
शिवसेना ठाकरे गट: 06
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट:  15
काँग्रेस :   03
वंचित :    00
एमआयएम:  00
अपक्ष- 1

11. धाराशिवजिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा- 55
भाजप :  19
शिवसेना शिंदे गट :   15
शिवसेना ठाकरे गट:  7
राष्ट्रवादी काँग्रेस :  6
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 0
काँग्रेस :   3
समाजवादी : 1
एमआयएम:  00
अपक्ष : 4

12. लातूरजिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा- 59

भाजप :  18
काँग्रेस : 23
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 12
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *