प्रल्हाद भांगले स्मृती कनिष्ठ गटाची मैदानी स्पर्धा
ठाणे: सिम्पथिझर्स स्पोर्ट्स क्लब तर्फे ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव, मुंबई विद्यापीठाचे ५००० मिटर धावण्याच्या शर्यतीतील विक्रमवीर,माजी राष्ट्रीय धावपटू प्रल्हाद भांगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १४ वी ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्री मावळी मंडळाच्या क्रीडांगणावर १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रंगणाऱ्या या स्पर्धेत ८ ते १४ वर्ष वयोगटाच्या एकंदरीत आठ गटांच्या मुले – मुलींच्या स्पर्धा होतील. विनामूल्य असलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना रोख बक्षिसे, पदकं आणि प्रमाणपत्र आणि सांघिक विजेतेपद देऊन गौरवण्यात येईल. आयोजकांना स्पर्धेत ७०० छोट्या धावपटूंचा सहभाग अपेक्षित आहे. अधिक माहिती आणि स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक अहेर यांचेशी  (९८२०४९७९३७) संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *