समाजभूषण नासिकेत पानसरे आदर्श पत्रकार ; दैनिक संध्यातर्फे पुरस्कार प्रदान
मुंबई : महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले मंत्रालय , मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक ‘दै. संध्या’च्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात येतो. ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांना यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान दै. संध्याच्या संपादिका सौ.ज्योती नाळे आणि पुणे मनपाचे नगरसेवक दादासाहेब कोद्रे यांच्या शुभहस्ते नीतू मांडके सभागृह, पुणे येथे प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *