ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधीना बोलू दिले जात नसल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे,  त्यांच्या विरोधात ११८ खासदारांना अविश्वासाच्या ठरावावर स्वाक्षरी केली आहे. लोकसभेच्या अध्यंक्षाविरोधात अविश्वास ठराव आणण्याची आजवरची ही चौथी वेळ आहे.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली या प्रस्तावाची सूचना सचिवालयात सादर करण्यात आली. या प्रस्तावात तृणमूल काँग्रेस विरोधकांसोबत नाही.

आतापर्यंत असे तीन अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. पहिला १८ डिसेंबर १९५४ रोजी तत्कालीन सभापती जी.व्ही. मावळणकर यांच्याविरुद्ध होता, हा प्रस्ताव चर्चेनंतर फेटाळण्यात आला. दुसरा २४ नोव्हेंबर १९६६ रोजी सभापती हुकम सिंह यांच्याविरुद्ध होता. ५० पेक्षा कमी सदस्यांचा पाठिंबा असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तिसरा १५ एप्रिल १९८७ रोजी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष बलराम झाखर यांच्याविरुद्ध होता. हा प्रस्तावही चर्चेनंतर फेटाळण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *