डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवण्यासाठी धावतोय एक ध्येयवेडा तरुण
विशाख कृष्ण स्वामी सलग ३७० दिवस दररोज ४२ किलोमीटर धावण्याचा करणार रेकॉर्ड
कल्याण : डोंबिवलीतील विशाख कृष्ण स्वामी हा धावपटू आता पर्यन्त धावण्याचे बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. यावेळेस तो दररोज तो ४२ किलोमीटर सलग ३७० दिवस धावून जागतिक रेकॉर्ड पार करणार आहे.
विशाख कृष्णस्वामी हा एक सामान्य डोंबिवलीकर असून त्याला धावण्याचे वेड आहे. आता पर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत त्याने अनेक रेकॉर्ड केलेत. मात्र आता त्याला यावेळेस एक मोठा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. तो दररोज ४२ किलोमीटर सलग ३७० दिवस धावणार आहे. ६३ दिवस झाले असून वर्ल्ड रेकॉर्ड मुळे तो महाराष्ट्राचे आणि डोंबिवली चे नाव जगात मोठं करणार आहे ही त्याची जिद्द आहे. विशाख कृष्ण स्वामी हा एका सामान्य कुटुंबातला आहे. त्याला लहानपणापासून खेळाची जास्त आवड असल्यामुळे आता डोंबिवलीकर त्याला सपोर्ट करत आहेत.
